शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
3
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
4
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
5
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
6
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
7
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
8
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
9
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
10
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
11
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
12
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
14
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
15
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
16
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
17
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी संख्येअभावी उत्पन्न अत्यल्प

By admin | Updated: July 24, 2014 00:08 IST

बीड: महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतील लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना शासनाने प्राधिकृत केलेली विमा कंपनी पैसे देते.

बीड: महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतील लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना शासनाने प्राधिकृत केलेली विमा कंपनी पैसे देते. जिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव असल्या कारणामुळे या योजनेचे लाभार्थी उपचारासाठी पसंती देत नसल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. शासनाने दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील (पांढरी शिधा पत्रिकाधारक वगळता) नागरिकांना अत्याधुनिक व सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु केली आहे. ही योजना एका राष्ट्रीय विमा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे. या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील सर्व व्यक्तींना घेता येणे शक्य आहे. यामध्ये जनरल सर्जरी, पेडियाट्रीक सर्जरी, न्युरो सर्जरी, बर्न यासह वेगवेगळ्या प्रकारच्या आजारावर शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना जिल्हा रुग्णालयातील राजीव गांधी जीवनदायी योजना विभागाशी संपर्क साधून त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर लाभार्थ्यांना एक कार्ड देण्यात येते. या कार्डवर एक कुटुंब एक वर्षात दीड लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया किंवा उपचार घेऊ शकतो. या योजनेचा अधिक प्रचार व प्रसार झाल्यामुळे दिवसागणिक लाभार्थी नोंदणीची प्रक्रिया वाढली आहे. लाभार्थ्यांना उपचार घेण्यासाठी त्यांची प्राथमिक तपासणी केली जाते. आजार गंभीर असल्यास किंवा रुग्णास शस्त्रक्रियेची गरज भासल्यास त्याला ज्या ठिकाणी इच्छा असेल त्या ठिकाणी तो रुग्ण उपचार घेऊ शकतो. काय झाली समस्याबीड जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवरच व्यवस्थित उपचार होत नसल्याने राजीव गांधी जीवनदायी योजनेचे लाभार्थी जिल्हा रुग्णालयात उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी येत नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे लाभार्थी जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत नसल्याने रुग्णालयास उत्पन्न मिळत नाही. केवळ तीन ते चार जणांनी उपचार घेतले आहेत. त्यांच्या विम्याचे बिल अद्याप जिल्हा रुग्णालयास मिळणे बाकी आहे. त्या तुलनेत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बऱ्यापैकी उपचार होत असल्याने अनेक रुग्ण तेथे उपचार घेण्यास पसंती देत आहेत. वर्षभराच्या कालावधीत वीस ते पंचवीस रुग्णांना उपचार घेतले असून त्यातून स्वारातीला चाळीस लाखांच्या जवळपास उत्पन्न मिळाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राजीव गांधी योजनेर्तंगत लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना अधिक रक्कम दिली जाते. मात्र जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे येथे उपचारासाठी येण्यास रुग्णांनी पाठ फिरवली आहे. (प्रतिनिधी)जिल्हा शल्यचिकित्सकांचेही दुर्लक्षजिल्हा रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याने शस्त्रक्रियेसाठी अनेकांनी फिरवली पाठराजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना मिळतो निधीबीड जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने इतर रुग्णालयांना पसंती