शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

किमान तापमान ८ अंशांवर गेल्याने जिल्हा गारठला...

By admin | Updated: December 3, 2014 01:16 IST

बालाजी थेटे; औराद शहाजानी जिल्ह्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ यंदा पाऊस कमी असला तरी थंडीचा कडाका मात्र गतवर्षीपेक्षा अधिक जाणवत आहे़



बालाजी थेटे; औराद शहाजानी
जिल्ह्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ यंदा पाऊस कमी असला तरी थंडीचा कडाका मात्र गतवर्षीपेक्षा अधिक जाणवत आहे़ निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी या सीमावर्ती भागात सर्वात कमी तापमानाची नोंद दरवर्षी होते़ गेल्या दहा दिवसांत किमान तापमानात घट होत चालली आहे़ मंगळवारी किमान ८़५ अंशाची नोंद झाली असून थंडीचा कडाका वाढत असल्याने शेकोट्याही पेटल्या आहेत़
जिल्ह्यातील अनेक साठवण तलाव व प्रकल्प कोरडेठाक आहेत़ अशा परिस्थितीतही थंडीचा कडाका वाढतच चालला आहे़ सीमावर्ती भाग असलेल्यान निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसर दरवर्षी थंडीमुळे गोठला जातो़ यावर्षीही थंडी वाढली असून किमान तापमान ८ अंशापर्यंत येत आहे़ गेल्या दहा दिवसांपासून किमान तापमानात १ ते २ अंशाचा फरक पडत आहे़ गतवर्षी ११८३ मिमी़ पावसाची नोंद झाल्याने थंडीचा कडाकाही अधिक होता़ मागील वर्षी ४ अंशापर्यंत सीमावर्ती भागात तापमान गेले होते़ यंदा पाऊस कमी असल्याने थंडी कमी होईल, असा अंदाज फोल ठरला़ वाढत्या थंडीतून सुटका करून घेण्यासाठी नागरिक व शेतकरी शेकोटी आणि उबदार कपड्याचा वापर करीत आहेत़ ४
औराद शहाजानी हे २५ हजार लोकवस्तीचे गाव़ सीमावर्ती भागातील मोठी बाजारपेठ आहे़ त्यामुळे दररोज सकाळी ७ वाजेपर्यंत बाजारात नागरिकांची लगबग असते़ मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून थंडी वाढल्याने दुकाने दहा वाजता उघडत आहेत़ बाजारात ग्राहकच येत नसल्याने गावात शुकशुकाट आहे़ सकाळी दहा वाजेनंतरच बाजारपेठेत वर्दळ आहे़ सायंकाळी ५ वाजताच पुन्हा गर्दी ओसरत असल्याने व्यवसायावरही परिणाम झाला आहे़ मागील वर्षी किमान तापमान ४ अंशापर्यंत गेले होते़ आता हळूहळू तापमान कमी होत जात असल्याने यावर्षी गतवर्षीसारखी अवस्था झाल्यास व्यवसाय थंडावणार आहे़