शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’ तर सेटलमेंट पक्ष

By admin | Updated: April 16, 2015 01:02 IST

औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष नेहमीच सेटलमेंट करीत आला आहे.

औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष नेहमीच सेटलमेंट करीत आला आहे. औरंगाबादेत मुस्लिम बांधवांना ‘कलमा’ पढण्यास सांगणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांनी अगोदर वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेसोबत केलेली छुपी युती जगासमोर मांडावी. असे खुले आवाहन समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आज औरंगाबादेत केले.समाजवादी पक्षाचे १२ उमेदवार औरंगाबाद मनपाच्या निवडणुकीत उभे करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रचारानिमित्त आझमी बुधवारी शहरात दाखल झाले. प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, एमआयएमचे दोन आमदार पालकमंत्री रामदास कदम यांच्या कक्षात जात होते. त्यांना रामदास कदमकडे जाऊ नका, असे काँग्रेस नेते आरेफ नसीम समजावून सांगत होते. त्यांचे न ऐकता दोन्ही आमदार त्यांच्याकडे कशासाठी गेले होते. वांद्रे पोटनिवडणुकीपूर्वी कदम आणि एमआयएमच्या आमदारांमध्ये कोणती सेटलमेंट झाली, याचे उत्तर दिले पाहिजे. एमआयएमचे काम न करणाऱ्या मुस्लिम बांधवांना थेट धर्माबाहेर काढण्याचा अधिकार कोणी दिला. एमआयएमचे नेते सच्चे मुसलमान असतील तर वांद्रे येथील गुपित जगासमोर मांडावे, असेही आझमी यांनी नमूद केले. समाजवादी पार्टीने वांद्रे पोटनिवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. एक चांगला नेता सभागृहात यावा हा त्यामागचा हेतू होता.राज्यातील सेना-भाजप युतीवर जोरदार हल्ला चढवत गोहत्याबंदीमुळे राज्यात असंख्य नागरिक बेरोजगार झाले. शेतकऱ्यांच्या वृद्ध जनावरांचा सांभाळ कोणी करावा. सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरांची नावे बदलल्याने विकास होत नाही. औरंगाबाद हे नाव चांगले आहे. औरंगजेब सेक्युलर होते. त्यांच्या नावाने शहर वसले आहे, त्यावर कोणाचा आक्षेप असायला नको. औरंगाबादेत मागील दहा वर्षांमध्ये हज हाऊसची स्थापना न झाल्याबद्दलही आझमी यांनी नाराजी दर्शविली. पत्रकार परिषदेला समाजवादी पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.