शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
4
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
5
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
6
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
7
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
8
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
9
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
10
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
11
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
12
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
13
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
14
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
15
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
16
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
17
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
18
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
19
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
20
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
Daily Top 2Weekly Top 5

३०० विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण

By admin | Updated: July 24, 2014 00:07 IST

कडा: येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात तब्बल ३०० मुलांना रायफल चालविण्यासह इतर प्रशिक्षण देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मुलांनाही सैन्याची शिस्त लागली जात आहे.

कडा: येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात तब्बल ३०० मुलांना रायफल चालविण्यासह इतर प्रशिक्षण देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मुलांनाही सैन्याची शिस्त लागली जात आहे. ‘परेड सावधान, अ‍ॅक्शन, फायर आणि ठाय- ठाय’ असा आवाज सध्या कडा परिसरात घुमू लागला आहे. त्याला कारणही तसेच आहे. येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहानपणापासून शिस्त लागावी, पुढील आयुष्यात पोलीस व सैन्यदलात काम करण्यासाठी अनुभव यावा तसेच विद्यार्थ्यांना विविध कला येण्यासह त्यांचे शरीर काटक बनावे यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे प्रशिक्षक विठ्ठल तांदळे यांनी सांगितले.या विद्यालयात गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी पालकांमध्येही आता उत्सुकता असल्याचे तांदळे यांनी सांगितले. शालेय अभ्यासक्रमा बरोबरच ठराविक कालावधीत विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येते. विद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांनी सैनिक प्रशिक्षणासाठी अनुमती आहे. अशाच विद्यार्थ्यांना यामध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना धावणे, उंचउडी, लांब उडी, भुईसपाटी, रायफल चालविणे आदींचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणाबरोबरच युद्ध प्रसंगीचे प्राथमिक धडेही दिले जात आहेत. समोरच्यावर आक्रमण कसे करावे, आक्रमण करताना कोण्या बाबीची काळजी घ्यावी यासह वेळ प्रसंगी आपले संरक्षण कसे करावे, याचेही यावेळी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच सकाळी १० ते ११ या वेळेत रायफल चालविण्या संदर्भात प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत आहे. दरम्यान, आष्टी तालुक्यात प्रथमच असा उपक्रम चालविला जात असल्याचे गटशिक्षणाधिकारी श्रीराम कनाके यांनी सांगितले. सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी या विद्यालयात मुलांची व मुलींची अशा वेगवेगळ्या तुकड्या तयार करण्यात आल्याचे हेमंत पोखर्णा यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांकडून सामाजिक कार्यही करून घेतले जात आहे. (वार्ताहर)