शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

एमजीएमचा पेट्रोल पंप स्थलांतरित करा

By admin | Updated: November 29, 2014 00:30 IST

औरंगाबाद : स्टेडियम आणि क्लब या सामाजिक उपक्रमासाठी सिडकोकडून घेतलेल्या जागेवर एमजीएमने पेट्रोल पंप उभारून त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला.

औरंगाबाद : स्टेडियम आणि क्लब या सामाजिक उपक्रमासाठी सिडकोकडून घेतलेल्या जागेवर एमजीएमने पेट्रोल पंप उभारून त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला. सामाजिक उपक्रमासाठी राखीव असलेल्या जागेचा व्यावसायिक वापर नको, असे नमूद करीत एमजीएममध्ये उभारलेला पेट्रोल पंप अन्य ठिकाणी स्थलांतरित करा, असा आदेश खंडपीठाचे न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती ए.एम. बदर यांनी इंडियन आॅईल कॉर्पोरेशन कंपनीला दिला.इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने सिडकोत पेट्रोल पंप वाटप करण्यासाठी अर्ज मागविले होते. एमजीएम संस्थेने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे इंडियन आॅईल कॉर्पोरेशनकडे पेट्रोल पंपासाठी अर्ज केला. त्यांचा अर्ज मंजूर करून २०१३ मध्ये इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने पेट्रोल पंप उभारला.सामाजिक उपक्रमासाठी वापर करण्याच्या अटीवर घेतलेल्या जागेचा व्यावसायिक वापर करण्यास सिडकोने आक्षेप घेतला. एमजीएमला नोटीस पाठवून जागेचा व्यावसाायिक वापर बंद करण्यास सांगितले. तेव्हा शासन अध्यादेशानुसार मिळालेल्या एकूण जागेपैकी १५ टक्के जागेचा व्यावसायिक वापर करता येतो, असे सांगून एमजीएमने नोटीस मागे घेण्याची विनंती सिडकोला केली. मात्र, सिडकोने या उत्तराची दखल न घेता पेट्रोल पंपाला सील लावले. त्या विरोधात इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने खंडपीठात याचिका दाखल केली. ती सुनावणीसाठी आली असता न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला होता. जनहित याचिका निकालीदरम्यान, ही याचिका पुन्हा न्यायालयासमोर आली असता सिडकोतर्फे अ‍ॅड. अनिल बजाज यांनी सांगितले की, एमजीएमने ज्या ठिकाणी पेट्रोल पंप उभारला, ती जागा स्टेडियम आणि क्लबसाठी दिलेली आहे.तसेच २००२ मध्ये एका जनहित याचिकेत एमजीएमने त्यांच्याकडील जागेचा वापर सामाजिक उपक्रमासाठीच करणार असल्याचे नमूद केले होते.