शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांची मध्यरात्री धाड

By admin | Updated: June 2, 2016 23:22 IST

सोनपेठ : जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांनीच कारवाईचा धडाका लावला आहे़

सोनपेठ : जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांनीच कारवाईचा धडाका लावला आहे़ बुधवारी मध्यरात्री सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी कारवाई करीत दोन संशयितांसह अवैधरित्या वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली आहेत़ या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे़ सोनपेठ आणि गंगाखेड तालुक्यामध्ये गोदावरी नदी कोरडी असल्याने नदीपात्रातून रात्रंदिवस अवैधरित्या वाळुचा उपसा केला जात आहे. १ जून रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल महिवाल सोनपेठ तालुक्यात दाखल झाले़ यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत महसूलचे पथकही होते़ या पथकाने तालुक्यातील खडका, कान्हेगाव, डोबाडी तांडा आदी ठिकाणी छापे टाकले़ यावेळी वाळू उपसा केला जात असताना सुनील यादव, व्यंकट सुरवसे व अंकुश ढवारे या तिघांसह एमए २४/एबी- ७००३ या क्रमांकाचा टिप्पर, एमएच २४/एएफ-३८१४ या क्रमांकाची स्कॉर्पिओ जीप पथकाने ताब्यात घेतली़ दरम्यान, या सर्व कारवाईत सुनील यादव हा पळून जाण्यास यशस्वी ठरला़ व्यंकट सुरवसे व अंकुश ढवारे या दोन आरोपींना पकडून दोन्ही वाहने पथकाने जप्त केली़ या पथकात तहसीलदार जीवराज डापकर, शिवाजी भराड, यादव, पोलिस कॉन्स्टेबल गुट्टे, वाघमारे यांचा समावेश होता़ (प्रतिनिधी)