शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयडीसी’ची होणार पोलखोल !

By admin | Updated: August 17, 2015 01:06 IST

बीड : जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती संदर्भातील विविध अडचणींवर तोडगा काढण्यासाठी व वसाहतीतील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी विधीमंडळ अंदाज समिती बीड

बीड : जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती संदर्भातील विविध अडचणींवर तोडगा काढण्यासाठी व वसाहतीतील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी विधीमंडळ अंदाज समिती बीड ‘एमआयडीसी’ला (महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ) भेट देवून बुधवारी पोलखोल करणार आहे. यामुळे उद्योगांऐवजी टोलेजंग इमारती उभारणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ही समिती उद्योजकांशीही चर्चा करून अडचणी जाणून घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात बीड, धारूर, आष्टी, पाटोदा, माजलगाव याठिकाणी औद्योगीक वसाहती आहेत, परंतु कोणत्याच वसाहतीत उद्योगांना पुरेल एवढी जागा उपलब्ध नाही. अपुऱ्या जागेतच उद्योग सुरू आहेत. या बाबत ‘लोकमत’ने ‘उद्योगांना ब्रेक’ या मथळ्याखाली वृत्त मालिका लावली होती. त्यानंतर आ.अमरसिंह पंडित यांनी यासंदर्भात अधिवेशनात आवाजही उठविला होता. येथील उद्योजकांनी आ.पंडित यांच्याकडे सोयी-सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीही केल्या होत्या. यावर उद्योजकांनीही जिल्हाधिकारी, तत्कालीन पालकमंत्री यांच्याकडे लेखी, तोंडी तक्रारी केल्या. परंतु यावर अद्यापही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे काही उद्योजकांना उद्योग सुरू करणे परवडणारे नव्हते. वीज, पाणी, रस्ते यासारख्या सुविधा नसल्याने उद्योगांना ब्रेक लागला होता. आ.अर्जून खोतकर अध्यक्ष आणि आ.अमरसिंह पंडित सदस्य असलेल्या विधीमंडळ अंदाज समिती बीडच्या एमआयडीसीत बुधवारी भेट देणार असून सर्व आढावा घेणार आहे. तसेच बीडमध्ये काय अडचणी आहेत, यावर उद्योजकांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)