अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत बैठक

By Admin | Updated: February 9, 2016 00:23 IST2016-02-08T23:40:10+5:302016-02-09T00:23:41+5:30

जालना : जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक बांधकाम असलेल्या स्थळांसंदर्भात जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात

A meeting with unauthorized religious places | अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत बैठक

अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत बैठक


जालना : जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक बांधकाम असलेल्या स्थळांसंदर्भात जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी नायक म्हणाले की, अनधिकृत बांधकामा संदर्भात कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, लोकमान्यता आदी विषयी पोलिसांचा अहवाल, विकास नियंत्रण नियमावली आणि विकास आराखडा इत्यादीच्या दृष्टीने पोलिस, टाऊन प्लॅनर व संबंधित भूधारक यांची संमती आदी तातडीने प्राप्त करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.
तसेच अनधिकृत धार्मिक स्थळांच्या नियमितीकरण, निष्कासनाचा प्रारु प कृती आराखडा जिल्हास्तरीय वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येऊन याबाबतीत कोणाला आक्षेप किंवा हरकती दाखल करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्तीचे आदेश नायक यांनी
दिले.
या संदर्भात चर्चा करण्यासाठी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजनही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी केल्या. यावेळी जालन्याचे उप विभागीय अधिकारी चिंचकर, अंबडचे श्रीमंत हारकर, भोकरदनचे लक्ष्मी नारायण मिश्रा, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.पी. काकडे, पोलीस निरीक्षक ए.के. घुले, न.प. उपमुख्याधिकारी मुखेडकर, तहसीलदार ज्योत्स्ना धुळे, नायब तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Web Title: A meeting with unauthorized religious places