शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘जनता विकास’च्या बैठकीत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 23:54 IST

औरंगाबाद : स्वतंत्र मराठवाडा राज्यनिर्मितीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मंथन करण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने शनिवारी आयोजित बैठकीत प्रचंड गदारोळ झाला.

औरंगाबाद : स्वतंत्र मराठवाडा राज्यनिर्मितीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मंथन करण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने शनिवारी आयोजित बैठकीत प्रचंड गदारोळ झाला. बैठकीत बहुसंख्य लोकांनी मराठवाडा वेगळे राज्य झाले पाहिजे, या बाजूने मते मांडली. तरीदेखील शेवटच्या निवेदनात परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्यनिर्मितीसाठी परिषद अनुकूल नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे काही जणांनी आयोजकांना धारेवर धरत जोरदार घोषणाबाजी केली. उपस्थितांची मते विचारात घ्यायचीच नव्हती तर बैठक बोलावलीच कशाला, असा जाबही त्यांनी विचारला.श्रीहरी अणे यांच्या वक्तव्यामुळे सध्या मराठवाड्यात स्वतंत्र मराठवाडा राज्यनिर्मितीच्या मुद्यावर वेगवेगळी चर्चा सुरू झाली. त्यामुळे या विषयावर भूमिका ठरविण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शहर शाखेच्या वतीने शनिवारी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासक, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. परिषदेचे पदाधिकारी शरद अदवंत आणि सारंग टाकळकर यांच्या सूचनेनुसार एकेकाने आपली या विषयावरील मते मांडण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बोलताना प्रा. विजय दिवाण यांनी वेगळ्या मराठवाड्याची मागणी करणे हा देशद्रोह असल्याची टीका केली. त्याप्रमाणे निशिकांत भालेराव यांनीही हीच बाजू मांडत संपूर्ण महाराष्ट्र एकसंध राहिला पाहिजे, अशी भूमिका मांडली. मराठवाडा जनता विकास परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी वेगळ्या मराठवाडा राज्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी दिवाण यांचे मत खोडून काढीत वेगळ्या राज्याच्या मागणीला देशद्रोह म्हणणे चुकीचे असल्याचे सांगितले. वेगळ्या मराठवाडा राज्याच्या प्रश्नावर मी आज कोणतीही एक ठाम भूमिका घेऊ शकत नाही. सुभाष लोमटे म्हणाले, मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत आला आहे. जगदीश भावठाणकर, मिर्झा अब्दुल कय्युम, स्वातंत्र्यसैनिक तारा लड्डा, ओमप्रकाश वर्मा, अ‍ॅड. लक्ष्मण प्रधान, कैलास तवार, प्रवीण जाधव, प्रमोद माने, निवृत्ती दराडे, विलास तांगडे आदींनी मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी स्वतंत्र राज्य झालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली. बैठकीच्या शेवटी सारंग टाकळकर यांनी परिषदेच्या वतीने निवेदन वाचून दाखविले. त्यात त्यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्यनिर्मितीला परिषद अनुकूल नसल्याचे जाहीर केले. टाकळकर यांनी हे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे मत असून, ते जनतेच्या मतांवर ठरत नाही, असे विधान केले. त्यामुळे वाद चिघळला. काहींनी परिषदेचे मत जे काय आहे ते असू द्या, पण बैठकीतील उपस्थितांची मतेही निवेदनात नोंदवा, अशी मागणी केली.