आत्मज्ञानासाठी हवी ध्यानसाधना

By Admin | Updated: April 27, 2015 01:01 IST2015-04-27T00:35:39+5:302015-04-27T01:01:25+5:30

बीड : ध्यानसाधना केल्यामुळे आरोग्य उत्तम रहातेच शिवाय आत्मज्ञान देखील तेजोमय होते, असे प्रतिपादन पतंजलि योग समितीचे मंडल प्रभारी विष्णूजी भूतडा यांनी केले.

Meditation requires knowledge | आत्मज्ञानासाठी हवी ध्यानसाधना

आत्मज्ञानासाठी हवी ध्यानसाधना


बीड : ध्यानसाधना केल्यामुळे आरोग्य उत्तम रहातेच शिवाय आत्मज्ञान देखील तेजोमय होते, असे प्रतिपादन पतंजलि योग समितीचे मंडल प्रभारी विष्णूजी भूतडा यांनी केले.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मागील १५ दिवसांपासून शहरात पतंजलि योग समितीच्या वतीने योग दिंडीचा उपक्रम सुरू आहे. रविवारी शहरातील सूर्या लॉन्स येथे सुरू असलेल्या दुसऱ्या योग दिंडीचा समारोप झाला. जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. मंचावर अ‍ॅड. श्रीराम लाखे, शिवाजी जाधव, आर. व्ही. वजूरकर, रत्नाकर कुलकर्णी, हेमा विभूते, नितीन गोपण, प्रा. राजेंद्र गाडेकर, बालाप्रसाद वैष्णव, बाबासाहेब कुडके, बाळासाहेब सुरवसे, बीडकर, क्षीरसागर, सुधाकर शिंदे, गोपाळ धांडे यांची उपस्थिती होती.
योगशिक्षक भुतडा म्हणाले, आपण आरोग्यावर हजारो रूपये खर्च करतोत. त्यापेक्षा योग साधनेचा अवलंंब केला तर निरोगी जीवन जगण्याचा आनंद घेता येऊ शकतो. धावपळीच्या युगात प्रत्येकजण आरोग्यकडे दुर्लक्ष करत आहे. हे थांबविण्यासाठी योग साधनेचे माध्यम उत्तम आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने बीडकरांना योग साधनेची मेजवाणी मिळत आहे. याचा लाभ घेतला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Meditation requires knowledge