शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्रसारमाध्यमांनी लक्ष्मणरेषा ओलांडू नये

By admin | Updated: September 14, 2014 00:22 IST

औरंगाबाद : प्रसारमाध्यमांनी लक्ष्मणरेषा ओलांडू नये, असा सल्ला तेलंगणा व आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कल्याण ज्योती सेनगुप्ता यांनी दिला.

औरंगाबाद : न्यायिक, वैधानिक कार्यपद्धतीचे वार्तांकन करताना प्रसारमाध्यमांनी लक्ष्मणरेषा ओलांडू नये, असा सल्ला तेलंगणा व आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कल्याण ज्योती सेनगुप्ता यांनी आज येथे दिला.माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालयातर्फे तापडिया नाट्यमंदिर येथे आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन न्यायमूर्ती कल्याण ज्योती सेनगुप्ता यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. आर.डी. देशपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे उपस्थित होते. ‘प्रसारमाध्यमांद्वारा करण्यात येत असलेल्या न्यायिक व वैधानिक कार्यपद्धतीचे वार्तांकन’ हा चर्चासत्राचा विषय आहे. यावेळी न्यायमूर्ती सेनगुप्ता पुढे म्हणाले की, भारतातील प्रसारमाध्यमांचा इतिहास उत्कृष्ट आहे. त्याचा विचार करता सामाजिक व कायदेशीर बाबींचा विचार करून प्रसारमाध्यमांनी न्यायिक, वैधानिक कार्यपद्धतीबाबत वार्तांकन करताना लक्ष्मणरेषा ओलांडू नये. या चर्चासत्रात सादर होणाऱ्या विविध शोधनिबंधांच्या संपादित पुस्तिकेचे विमोचन यावेळी न्यायमूर्ती सेनगुप्ता यांच्या हस्ते झाले. चर्चासत्राचे बीजभाषण करताना डॉ. गव्हाणे म्हणाले की न्यायिक, वैधानिक कार्यपद्धतीविषयी वार्तांकन करताना प्रसारमाध्यमांनी समन्वयाची भूमिका वठविणे अपेक्षित आहे. प्राचार्य डॉ. सी.एम. राव यांनी महाविद्यालयाची माहिती दिली, तर प्रा. बी.व्ही. परांजपे यांनी चर्चासत्राच्या विषयाची माहिती सांगितली. यावेळी नेहा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विविध महाविद्यालयांतील विधि शाखेचे विद्यार्थी, संशोधकांची उपस्थिती होती. उद्घाटन सत्रानंतर पहिले सत्र प्रसारमाध्यमांचे ‘संवैधानिक अधिष्ठान’, दुसरे सत्र ‘वार्तांकनाचे विविध पैलू-उदयोन्मुख प्रवाह’, तर तिसरे सत्र ‘माध्यमांची स्वायत्तता, विरुद्ध सरकारी नियंत्रण’ या विषयावर पार पडले.