एमसीएच विंग ‘घाटी’तच हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:05 IST2021-07-29T04:05:16+5:302021-07-29T04:05:16+5:30

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून (घाटी) २०० खाटांच्या स्वतंत्र माता व बालसंगोपन (एमसीएच विंग) विभागासंदर्भातील अहवाल बुधवारी ...

The MCH wing should be in the valley | एमसीएच विंग ‘घाटी’तच हवा

एमसीएच विंग ‘घाटी’तच हवा

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून (घाटी) २०० खाटांच्या स्वतंत्र माता व बालसंगोपन (एमसीएच विंग) विभागासंदर्भातील अहवाल बुधवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मागविला. यासंदर्भात क्षणाचाही विलंब न करता सविस्तर टिपणी असलेला अहवाल अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी पाठविला.

शासनाने घाटी रुग्णालयातील एमसीएच विंग रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांनी मंगळवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली. यासंदर्भात पुनर्विचार होण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे यावेळी अमित देशमुख यांनी सांगितले. दुसऱ्याच दिवशी बुधवारी, एमसीएच विंगसंदर्भात अधिष्ठातांच्या टिपणीसह अहवाल मागविण्यात आला. त्यामुळे घाटी रुग्णालयात एमसीएच विंग होईल, यादृष्टीने पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

शहरातील दूध डेअरीच्या जागेत २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्यामुळे घाटीतील एमसीएच विंग रद्द करण्यात आले. दूध डेअरीच्या जागेतच हे विंग होईल, असा दावा आरोग्य विभागाकडून होत आहे; परंतु याठिकाणी हे विंग झाले तर गंभीर अवस्थेतील माता, शिशूंसाठी घाटीत यावे लागेल. त्यामुळे हा विंग घाटीतच हवा, असा आग्रह धरला जात आहे.

Web Title: The MCH wing should be in the valley