शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

महापौर कुटुंबियांकडे थकला मालमत्ता कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:22 IST

मग नागरिक कर कसे भरणार 

ठळक मुद्देमहापालिका प्रशासनाने कराची विभागणीच केली नाही

औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांच्या कुटुंबियांकडे जाधवमंडी येथील दोन मालमत्तांचा तीन लाख रुपयांहून अधिक कर थकला आहे. जाधववाडी येथील घरावर तब्बल २ लाख ७९ हजार कर थकला आहे. याच भागातील आणखी एका मालमत्तेवर ६५ हजार कर थकला आहे. या दोन्ही मालमत्ता महापौरांचे बंधू रमेश घोडेले यांच्या नावावर आहेत. २०११ मध्ये त्यांनी एका ठिकाणी अपार्टमेंट बनवून फ्लॅटही विक्री केले. मालमत्तांचे पोटविभाजन करून प्रत्येकाला वेगवेगळा कर लावावा, अशी मागणी रमेश घोडेले यांनी मनपाकडे केली. आठ वर्षांमध्ये प्रशासनानेही विभाजन करून दिलेले नाही. त्यामुळे मूळ मालकावरच  कर लावण्यात येत आहे.

शहराचे प्रथम नागरिक असणाऱ्या महापौरांचे कुटुंब कर भरत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कर का भरावा, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.  जाधवमंडी येथे महापौरांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. सध्या ही मालमत्ता त्यांचे मोठे भाऊ रमेश यांच्या नावावर आहे. एक मालमत्तेवर अपार्टमेंट बांधून विकण्यात आले. दुसरी मालमत्ता आजही जशास तशी आहे. २०११ पासून कर भरलाच नसल्याची मनपा दप्तरी नोंद आहे.

३०० कोटी तिजोरीत येणे अपेक्षितमहापालिका प्रशासन मालमत्ता कराच्या वसुलीसाठी दरवर्षी जोरदार प्रयत्न करते. प्रशासनाच्या वसुलीसाठी अनेकदा जोरबैठकाही होतात. यातून काहीच साध्य होत नाही. दरवर्षी किमान ३०० कोटी रुपये मालमत्ता करातून मनपाच्या तिजोरीत येणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ११० कोटी रुपयेच येतात. प्रामाणिकपणे स्वत:हून वॉर्ड कार्यालयात रांग लावून मालमत्ता कर भरणारे मोजकेच नागरिक आहेत. त्यामुळे मनपाला किमान १०० कोटी रुपये तरी मालमत्ता करातून मिळत आहेत. 

अनेक मालमत्तांचा वादवॉर्ड कार्यालयांकडे अनेक नागरिक मालमत्ता कराचे विभाजन करून द्यावे म्हणून अर्ज करतात. या अर्जावर प्रशासन अजिबात विचार करीत नाही. शहरातील नऊ झोन कार्यालयांमध्ये किमान १५ ते १८ हजार मालमत्तांना कर विभाजन करून हवे आहे.

वॉर्ड कार्यालयाला दिला अनेकदा अर्जजाधवमंडी येथील मालमत्ताकराचे विभाजन करून द्यावे, असे पत्र अनेकदा वॉर्ड कार्यालयाला देण्यात आले आहे. प्रशासन पोटविभाजन करून देण्यास तयार नाही. त्यामुळे मालमत्ताकर थकला आहे. २०११ पासून प्रशासनाने सध्या मालक असलेल्यांना कर लावून दिला पाहिजे. प्रशासन आजही मूळ मालकावरच कर लादत आहे.- नंदकुमार घोडेले, महापौर

टॅग्स :TaxकरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMayorमहापौर