छ. संभाजीनगरात गोडाऊन पेटले; नव्याकोऱ्या रिक्षा, चारचाकी आगीच्या भक्षस्थानी, लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:33 IST2026-03-24T17:30:59+5:302026-03-24T17:33:04+5:30

अग्निशमन दलाचे अनेक बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Massive Fire at Pagariya Auto Godown on Paithan Road, Chhatrapati Sambhajinagar; Hundreds of New LPG Autoriksha Vehicles Gutted | छ. संभाजीनगरात गोडाऊन पेटले; नव्याकोऱ्या रिक्षा, चारचाकी आगीच्या भक्षस्थानी, लाखोंचे नुकसान

छ. संभाजीनगरात गोडाऊन पेटले; नव्याकोऱ्या रिक्षा, चारचाकी आगीच्या भक्षस्थानी, लाखोंचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर: शहरातील पैठण रोडवरील कांचनवाडी परिसरात असलेल्या पगारिया ऑटोच्या गोडाऊनला आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमध्ये उभ्या असलेल्या शेकडो नवीन रिक्षा आणि मालवाहू गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. आगीचा भडका इतका मोठा आहे की, धुराचे लोट पैठण रोडवरून मैलोन्मैल अंतरावरून दिसत आहेत.

ज्या ठिकाणी आग लागली, तिथे सुमारे १०० हून अधिक नवीन एलपीजी रिक्षा पार्क होत्या. आगीची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी आणि पगारियाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता अनेकांनी पेटत्या गोडाऊनमधून रिक्षा आणि इतर चारचाकी गाड्या बाहेर काढल्या, ज्यामुळे मोठा स्फोट होण्याचा धोका टळला. सध्या अग्निशमन दलाचे अनेक बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उष्णता आणि इंधनामुळे आगीचा भडका
घटनेची माहिती मिळताच माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी घटनास्थळी धाव घेतली. "नवीन गाड्यांमध्ये असलेल्या इंधनामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे आगीचा भडका वाढत आहे," अशी माहिती त्यांनी दिली. तासाभरानंतरही आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवता आलेले नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title : छत्रपति संभाजीनगर में वाहनों के गोदाम में भीषण आग, लाखों का नुकसान

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में एक वाहन गोदाम में भीषण आग लग गई, जिसमें सैकड़ों नए ऑटो-रिक्शा जलकर राख हो गए। अग्निशमन कर्मी आग बुझाने में लगे हैं, आशंका है कि आग अत्यधिक गर्मी और वाहन ईंधन से भड़की। अनुमानित नुकसान लाखों रुपये है।

Web Title : Massive Fire Engulfs Vehicle Godown in Chhatrapati Sambhajinagar, Losses Estimated

Web Summary : A major fire broke out at a vehicle godown in Chhatrapati Sambhajinagar, destroying hundreds of new auto-rickshaws. Firefighters are battling the blaze, suspected to be fueled by extreme heat and vehicle fuel. The estimated losses amount to lakhs of rupees.