शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा छळ; पतीस शिक्षा

By admin | Updated: August 9, 2014 00:27 IST

औंढा नागनाथ : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीस दंड ठोठावला.

औंढा नागनाथ : माहेराहून पन्नास हजार रूपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीस दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा तसेच ५ हजार रूपये दंड ठोठावला. औंढा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने हा निकाल दिला असून या खटल्यातील इतर सात आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली दराडे येथील रमाबाई (वय २८) हिचा विवाह २००२ मध्ये साळणा येथील गंगाधर शंकर खिल्लारे (वय ३२) याच्याशी झाला.
लग्नानंतर नवरा व घरातील इतर सदस्यांनी ६ वर्षे चांगले नांदविले. त्यानंतर नवरा, सासरा, सासू, दीर, चुलत सासरा, चुलत सासू, नणंद यांनी शेतात विहीर खोदण्यासाठी व पाईपलाईन करण्याकरिता माहेराहून ५० हजार रूपये घेऊन ये, म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला, या आशयाची फिर्याद रमाबाई गंगाधर खिल्लारे हिने पोलिसांत दिली. त्यावरून आरोपी गंगाधर शंकर खिल्लारे (नवरा), शंकर चांगोजी खिल्लारे (सासरा), सारजाबाई शंकर खिल्लारे (सासू), सुधाकर शंकर खिल्लारे (दीर), कुंडलिक चांगोजी खिल्लारे (चुलत सासरा) जानकाबाई कुंडलिक खिल्लारे (चुलत सासू), अरूणा पांडुरंग ढगे (नणंद), शिलाबाई मिलिंद मोरे (नणंद सर्व रा.साळणा) यांच्याविरूद्ध कलम ४९८ अ, ३४ भादंविनुसार औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. एन. शेख यांनी गुन्ह्याचा तपास करून सर्व आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
हा खटला औंढा येथील प्रथमवर्ग न्यायालयात चालला. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर औंढा न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेंडगे यांनी ६ आॅगस्ट रोजी या खटल्याचा निकाल दिला.
आरोपी गंगाधर शंकर खिल्लारे यास कलम ४९८ अ भादंविनुसार दोषी ग्राह्य धरून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रकमेपैकी ४ हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून रमाबाई खिल्लारे या हिला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.महेश आहेर यांनी काम पाहिले. (वार्ताहर)