शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 00:09 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसामुळे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसामुळे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीवरदेखील याचा परिणाम झाला आहे. पावसामुळे कोणत्या जिल्ह्यांत किती नुकसान झाले, याचा अहवाल तयार केला जात असून, खड्ड्यांमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी किमान २२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सूत्रांकडून मिळाली आहे. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱ्या सुमारे २१ हजार किलोमीटरपैकी ४ हजार कि़ मी. रस्ते खराब झाले आहेत. खड्डे दुरुस्तीसाठी व पावसाळ्यात क्षती पोहोचणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २२०० कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती, खचलेल्या रस्त्यांचे नूतनीकरण व मजबुतीकरणाचा खर्च या निधीतून करण्यात येईल. मुख्य अभियंता एम. एम. सुरकटवार यांनी याप्रकरणी सर्व अधीक्षक अभियंत्यांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.राज्य निधीतून बांधण्यात आलेले मोठे रस्ते, त्यानंतर राज्य महामार्ग आणि जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर पावसाळ्यात व त्यापूर्वी खड्डे पडले असतील तर त्यातील काही रस्त्यांचे नूतनीकरण किंवा मजबुतीकरणाचे काम पावसाळ्यानंतरच हाती घेण्यात येईल. ज्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडतील. त्यांची डागडुजी तातडीने करण्यासाठी विभागाने तयारी केली आहे.विभागात केंद्र शासन, राज्य शासनाचे मिळून ६५ हजार ४९७ किलोमीटर रस्ते आहेत. १२ हजार २५२ जिल्हा रस्ते आणि ३१ हजार ३६८ किलोमीटर ग्रामीण रस्ते जिल्हा परिषदेकडे आहेत. २१ हजार किलोमीटर रस्ते बांधकाम, तर ८१६ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची देखभाल केंद्र शासन करते. मराठवाडा विभागात जुलैअखेरपर्यंत ५१.९ टक्के पाऊस सरासरीच्या तुलनेत झाला आहे. सर्वच जिल्ह्यांत पाऊस झाला असून, रस्त्यांचे नुकसान झाले आहे.