शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मराठवाड्याला दमदार पावसाची प्रतीक्षा; अवघा ६.३७ टक्के पाऊस, पेरण्या खोळंबल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 12:09 IST

मराठवाडा विभागाचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ६७९.५

औरंगाबाद / लातूर/ हिंगोली : मराठवाड्यात १५ जूनपर्यंत ६.३७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अद्याप दमदार पाऊस पडला नाही. मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे विभागात उशिरा पावसाला सुरुवात झाली असून, याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. 

बुधवारी लातूर आणि हिंगोलीत मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. हिंगोली शहर व जिल्ह्यात मंगळवारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास काही भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. लातुरात दिवसभर उकाडा जाणवला. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले व दुपारी ४ वाजेच्या सुमारास लातूर शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे बाजारात शेतकरी, व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंजगोलाई, दयानंद गेट, पाच नंबर चौक, रेणापूर नाका, राजीव गांधी चौक आदी भागातील हातगाडे व्यावसायिक, रयतू बाजारातील व्यापारी, शेतकऱ्यांनी पावसामुळे लवकरच दुकाने गुंडाळली. हरंगुळ बु, हरंगुळ खु., बसवंतपूर, खाडगाव, खोपेगाव आदी भागात जवळपास अर्धा तास रिमझिम पाऊस पडला.

१४ जून रोजी हिंगोली जिल्ह्याचे तापमान कमाल ३३, तर किमान २४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत कडक ऊन पडले होते. दुपारी साडेतीन वाजता ढग जमायला सुरुवात झाली होती. त्यानंतर दुपारी चार ते साडेचार वाजेपर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. जिल्ह्यातील कहाकर (बु.), केंद्रा (बु.), औंढा नागनाथ, रामेश्वरतांडा, आखाडा बाळापूर, कळमनुरी गोरेगाव आदी गावांमध्ये पावसाने दमदार अशी हजेरी लावली. मेघगर्जना होत असल्यामुळे दरम्यान काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला होता.

वार्षिक पर्जन्यमानविभागाचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ६७९.५ मि. मी. आहे. यात औरंगाबाद ५८१ मि.मी., जालना ६०३, बीड ५६६, लातूर ७०६, उस्मानाबाद ६०३, नांदेड ८१४, परभणी ७६१, तर हिंगोली जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७९५ मि.मी. इतकी आहे.

आजवर पडलेला पाऊसऔरंगाबादेत ८.७२ टक्के, जालना ६.५५ टक्के, बीड ८.११ टक्के, लातूर ४.५ टक्के, उस्मानाबाद ६.७५ टक्के, नांदेड ६.७ टक्के, परभणीत ६.१७ टक्के, तर हिंगोली जिल्ह्यात ४.६८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसMarathwadaमराठवाडाagricultureशेती