शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

मराठा कार्डही मोदी लाटेसमोर निष्प्रभ

By admin | Updated: May 18, 2014 00:39 IST

ग्रा मीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत मोदी लाटेचा प्रभाव जाणवल्याने जिंतूरातून शिवसेनेच्या उमेदवाराला लक्षवेधी मते घेता आली़ भांबळे यांचे मुस्लिम, दलित, मराठा ही मतदानाची त्रिसूत्री फोल ठरली़

ग्रा मीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत मोदी लाटेचा प्रभाव जाणवल्याने जिंतूरातून शिवसेनेच्या उमेदवाराला लक्षवेधी मते घेता आली़ भांबळे यांचे मुस्लिम, दलित, मराठा ही मतदानाची त्रिसूत्री फोल ठरली़ मोदी लाटेसमोर मराठा कार्ड निष्प्रभ ठरत शिवसेनेच्या बाजूने झुकले़ यामुळेच स्वत:च्या मतदारसंघातही भांबळे यांना मताधिक्य घेता आले नाही़ मतदारसंघात २ लाख १६ हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ यापैकी शिवसेनेचे उमेदवार जाधव यांना ९७ हजार ७३२ तर भांबळे यांना ९७ हजार २४८ तर बसपा उमेदवार गुलमीर खान यांना नाममात्र ५ हजार ८०० मते मिळाली़ जिंतूर तालुक्यातील शिवसेनेला ५४ हजार ९४३ तर राष्ट्रवादीला ६२ हजार ६०३ मते मिळाली़ मतदार संघात भांबळे ४९४ मतांनी पिछाडीवर आहेत़ जिंतूर शहरात जाधव यांना ४ हजार ८७३ मते तर भांबळे यांना ७ हजार ९८४ मते मिळाली़ शहरातून भांबळे यांना केवळ ३ हजार ११६ मतांची नाममात्र आघाडी आहे़ जिंतूर शहरातून मोठे मताधिक्य मिळेल, अशी आशा भांबळे यांना होती़ परंतु, शहरातील विविध मतदान केंद्रावर मोदी लाटेचा प्रभाव दिसला़ जिंतूर तालुक्यातून भांबळे यांना साधारणत: ७ हजार ६६० मतांची आघाडी दिसत असली तरी सेलू तालुक्यातून जवळपास ८ हजार १४४ मतांनी पिछाडीवर आहेत़ मतदानाचा हा ट्रेड पाहता मतदार संघात मोदी लाटेचाच प्रभाव दिसतो़ भांबळे यांनी मागील दोन-तीन वर्षांत केलेली विविध समाजोपयोगी कामे, कार्यकर्त्यांचा संच, विविध संस्थेवर विविध जाती, धर्माच्या पदाधिकार्‍यांना दिलेली संधी पाहता भांबळे यांना पडलेली मते ही अत्यल्प अशीच आहेत, असे असले तरी आ़ बोर्डीकरांनी मतदार संघात शिवसेनेला केलेली मदत भांबळे यांची मते कमी करण्यास काही प्रमाणात यशस्वी ठरली़ विशेष म्हणजे मतदानात दलित, मुस्लिम भांबळे यांच्यासोबत राहिली तरी मतदार संघातील सर्वात मोठा घटक मराठा समाज आहे़ हा समाज आपल्यासोबत राहील हा भांबळे यांचा विश्वास फोल ठरला़ शिवाय इतर विविध समाजाने शिवसेनेपेक्षा मोदींनाच पसंती दिल्याने स्वत:च्या हक्काच्या मतदार संघात भांबळेंना पिछाडीवर रहावे लागले़ काय घडले मतदारसंघात जिंतूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी शिवसेना उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे भांबळे यांना जिंतूर मतदार संघातून आघाडी घेता आली नाही़ शिवाय बोर्डीकरांचे संपूर्ण कार्यकर्ते शिवसेनेच्या प्रचारात गुंतल्याने मतदारसंघात शिवसेनेला आयते कार्यकर्ते मिळाले़ मतदार संघामध्ये वंजारी समाजाचे मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत़ शिवसेना उमेदवार बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे यांनी जिंतुरात घेतलेली सभा व बंडू जाधव नव्हे गोपीनाथ मुंडे उभा आहे, असे भावनिक केलेले आवाहन यामुळे वंजारी समाजाने शिवसेनेच्या पारड्यात मतदान केले़ याचा भांबळे यांना फटका बसला़ भांबळेंचे मुस्लिम, दलित, मराठा हे समीकरण बिघडले़ मुस्लिम समाज भांबळे यांच्यासोबत राहिला तर काही प्रमाणात दलित समाजानेही भांबळे यांना साथ दिली़ परंतु, मतदार संघातील मोठ्या प्रमाणावर असलेला मराठा समाज आपल्याकडे वळविण्यात भांबळे यश आले नाही़