शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

मानवतकरांची अर्धी रात्र अंधारात

By admin | Updated: July 30, 2014 00:47 IST

मानवत : पाथरी येथील १३२ के.व्ही. विद्युत केंद्रात ब्रेकडाऊन झाल्याने मानवतकरांची अर्धी रात्र अंधारात गेली. डासांनी संधीचा फायदा घेऊन लहान मुले आणि वृद्धांना अक्षरश: हैराण करून सोडले.

मानवत : पाथरी येथील १३२ के.व्ही. विद्युत केंद्रात ब्रेकडाऊन झाल्याने मानवतकरांची अर्धी रात्र अंधारात गेली. डासांनी संधीचा फायदा घेऊन लहान मुले आणि वृद्धांना अक्षरश: हैराण करून सोडले. मात्र कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने रात्री १२ वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. मानवत शहराला पाथरी येथील १३२ के.व्ही. विद्युत केंद्रावरून वीज पुरवठा होतो. २८ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पाथरी विद्युत केंद्रावर ब्रेकडाऊन झाला. मोठा बिघाड झाल्याने कर्मचाऱ्यांना तो लवकर दुरुस्त करता आला नाही; परंतु कर्मचाऱ्यांनी तब्बल सात तास अखंडितपणे काम करून मानवतकरांना वीज पुरवठा सुरळीत करून दिला. मागील काही दिवसांपासून रात्री-मध्यरात्री वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने मानवतकरांची झोप उडत आहे. कारण रात्रीच्या वेळी डासांच्या चाव्याने अबाल वृद्धांची झोपमोड होत आहे. मानवतच्या नागरिकांकडून वीज देयकाची रक्कम वेळेत भरल्या गेल्याने मानवतकरांना भारनियमन नसल्यात जमा आहे. भारनियमन कमी असले तरी वीज ग्राहकांना चांगली सेवा मात्र मिळत नाही. कारण वीज वितरण कंपनीकडे योग्य प्रमाणात कर्मचारी वर्ग नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांची दमछाक होते आणि लोकांच्या रोषालाही त्यांनाच बळी पडावे लागते. त्यामुळे मानवत येथे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वाढविण्याची गरज असून वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. (वार्ताहर)वीज कर्मचाऱ्यांची दमछाकमानवत शहराचा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर बी.आर. कांबळे, बी.पी. राऊत, ओ.आर. दायमा, सुनील माळनर, योगेश नावंडे, स्वप्नील शेटे, रामसिंग जुन्नी, सोमनाथ गळाकाटू यांनी पाथरी येथील १३२ के.व्ही. केंद्रावर जाऊन तसेच मानवतला वीज पुरवठा होणाऱ्या पूर्ण लाईनचे परीक्षण करून वीज सुरळीत करण्यासाठी तब्बल सात तास अविरत परिश्रम घेतले. यावेळी सहाय्यक अभियंता व्ही.एस. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता चेतन खटे हेही मार्गदर्शनासाठी सोबत होते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच वीज पुुरवठा सुरळीत होऊ शकला.