शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

विवेकी समाज उभारणीसाठी बांधिलकी कृतिशील करावी

By admin | Updated: August 21, 2014 00:12 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन फेरी काढण्यात आली.

औरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनीदेखील त्यांच्या खुनाच्या तपासाचा पाठपुरावा करावा लागत आहे. त्यामुळे आपला संताप, आपली वेदना आणि दु:ख व्यक्त करत महाराष्ट्रासह देशाला आणि जगाला विवेकी विचारांचा संदेश देण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. विवेकी समाज उभारणीसाठी आपली तन, मन, धनाची बांधिलकी कृतिशील करणे हीच खरी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली ठरेल, अशी भावना विविध वक्त्यांनी व्यक्त केली.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बुधवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून अभिवादन फेरी काढण्यात आली. औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून फेरी सरस्वती भुवन परिसरात आली. या ठिकाणी घेण्यात आलेल्या सभेत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी स्वातंत्र्यसैनिक चंदाताई जरीवाला, ताराबाई लड्डा, स.भु. शिक्षण संस्थेचे प्रा. दिनकर बोरीकर, ज्ञानप्रकाश मोदाणी, ज्येष्ठ लेखक, नाटककार अजित दळवी, मंगल खिंवसरा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष डॉ. रश्मी बोरीकर, शहर कार्याध्यक्ष डॉ. क्षमा खोब्रागडे, राज्य सरचिटणीस शहाजी भोसले, मोहन भोमे, लक्ष्मण महाजन, व्ही.सी. भुयागळे, बुद्धप्रिय कबीर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.अभिवादन फेरीत समविचारी पुरोगामी परिवर्तनवादी संघटना, संस्थांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे छायाचित्र तसेच विविध वाक्ये लिहिलेले फलक विद्यार्थ्यांनी हातात धरले होते. ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या’, अशा घोषणा देण्यात आल्या.