शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

उत्सव उद्योगाला मनपाचा झटका

By admin | Updated: May 13, 2015 00:27 IST

लातूर : लातूर औद्योगिक वसाहत परिसरात चार भूखंड एकत्रित करुन शहरातील चार डॉक्टर्सने उत्सव उद्योग या नावाने बांधकाम करीत असलेल्या इमारतीचा

लातूर : लातूर औद्योगिक वसाहत परिसरात चार भूखंड एकत्रित करुन शहरातील चार डॉक्टर्सने उत्सव उद्योग या नावाने बांधकाम करीत असलेल्या इमारतीचा बांधकाम परवाना लातूर महानगरपालिकेने रद्द केला आहे़ ११ मे रोजी मनपा आयुक्तांनी हा आदेश दिला असून, रद्द केलेला बांधकाम परवाना डॉ़ गिरीश मैंदरकर, डॉ़ मनिषा बिराजदार, डॉ़ संदीप कवठाळे व डॉ़ शिवाजी काळगे यांचा संयुक्त होता़ लातूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्था मर्यादीत लातूर येथे भूखंड क्ऱ ५६, ५७, ६२ व ६३ मध्ये वाणिज्य वापरासाठी बांधकाम परवान्याची मागणी होती़ अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे बांधकामासाठी परवानगी देण्यात आली होती़ परंतु, लातूर औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकांना उद्देशून जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी या चारही भूखंडाच्या एकत्रिकरणास उद्योग संचालनालयाची परवानगी नसल्याचे म्हटले होते़ शिवाय, भूखंडाचे अधिमुल्य भरणा शासनास केला नाही़ नियमानुसार हस्तांतरणात परवानगी घेतली गेली नाही़ त्यामुळे सदरील जागेवर बांधकाम करु नये, असे जिल्हा उद्योग केंद्राने कळविले़ संस्थेतील भूखंडामध्ये सेवा उद्योगासाठी नियमानुसार परवानगी घेतल्याचे दिसून आले नाही़ भूखंडावरील बांधकाम परवानगी रद्द किंवा फेरबदल का करु नये, असे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५१ अन्वये २४ एप्रिल २०१५ रोजी सुनावणी आयोजित केली होती़ या सुनावणीत दोन्ही बाजूचे म्हणणे विचारात घेऊन व कागदपत्राचे अवलोकन करुन औद्योगीक वसाहत सहकारी संस्थेतील भूखंड क्रमांक ५६, ५७, ६२, ६३ बांधकाम परवानगी प्रारंभ प्रमाणपत्रातील टिप अन्वये आपण भूखंड हस्तांतरणास शासनाची परवानगी न घेता व महाराष्ट्र प्रादेशिक, नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ अन्वये दिलेल्या बांधकाम परवानगी प्रारंभ प्रमाणपत्रामधील अटीचे उल्लंघन झाल्यामुळे आपणास अधिनियमानुसार दिलेले बांधकाम परवानगी रद्द करण्यात येत आहे, असे आदेश मनपा आयुक्तांनी ११ मे रोजी दिले आहेत़ या आदेशाच्या प्रति उत्सव उद्योगातील भागिदार डॉ़ गिरीश मैंदरकर, डॉ़ मनीषा बिराजदार, डॉ़ संदीप कवठाळे, डॉ़ शिवाजी काळगे यांनाही पाठविण्यात आले आहेत़ ५६, ५७, ६२, ६३ या भूखंडावर कोणतेही बांधकाम चालू ठेवू नये, अन्यथा जागेवरील बांधकामावर अनधिकृत बांधकामाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही या आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे़ दरम्यान, या प्रकरणी माहितीच्या अधिकारात पाठपुरावा करुन मल्लिकार्जून भाईकट्टी यांनी बांधकाम परवाना रद्द करण्याची मागणी केली होती़ (प्रतिनिधी)मुंबई येथील उद्योग संचालनालयाकडे हस्तांतरणाच्या परवानगीचा प्रस्ताव सादर केला आहे़ त्यांच्या परवानगीची प्रतीक्षा आहे़ सध्या आमच्या बांधकामाला आयुक्तांनी स्थगिती दिली आहे़ आम्ही नियमबाह्य काहीच करणार नाही़ त्यामुळे सध्या बांधकाम बंद ठेवले आहे़ कायदेशीर परवानगी घेऊनच बांधकाम केले जाईल़ सदरील भूखंडांवर बांधकाम सुरु करण्यापूर्वी रितसर परवानगीच घेतली होती़ परंतु, मनपा आयुक्तांनी ही परवानगी रद्द केली आहे़ त्यामुळे आम्ही उद्योग संचालनालयाकडे परवानगी मागितली आहे, असे डॉ़ शिवाजी बडाप्पा काळगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़