शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

‘मैत्रेय’ला टाळे!

By admin | Updated: December 31, 2015 00:56 IST

औरंगाबाद : अल्पावधीत जास्तीचा परतावा देण्याचे सांगून हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या मैत्रेय या कंपनीच्या श्रेयनगर येथील कार्यालयाला बुधवारी अचानक टाळे लागले.

औरंगाबाद : अल्पावधीत जास्तीचा परतावा देण्याचे सांगून हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या मैत्रेय या कंपनीच्या श्रेयनगर येथील कार्यालयाला बुधवारी अचानक टाळे लागले. आधीच कंपनीकडून मिळालेले परताव्याचे धनादेश अनादरित होत असल्याने हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये या प्रकाराने एकच खळबळ उडाली. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच कंपनीच्या कार्यालयासमोर गुंतवणूकदार ठिय्या मांडून बसले होते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला. प्राप्त माहिती अशी की, मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर प्रा. लि., आणि मैत्रेय रिलेटर्स अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि., या वेगवेगळ्या नावाच्या कंपन्यांकडून गेल्या काही वर्षांपासून शहरातील हजारो गुंतवणूकदारांकडून मोठ्या रकमा गोळा केल्या जात आहेत. गुंतवलेल्या रकमेवर बारा टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखवून कंपनीकडून सामान्यांना गुंतवणूक करण्यास सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या कंपनीच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. विशेषत: गोरगरीब, झोपडपट्टीत राहणारा छोटा गुंतवणूकदार, शेतकरी, मजूर कंपनीचे ग्राहक आहेत. एकरकमी अथवा दरमहा, त्रैमासिक, सहामाही अथवा वार्षिक असे पर्याय ग्राहकांना पैसे जमा करण्यासाठी कंपनीने दिलेले आहेत. शिवाय जास्तीत जास्त सहा वर्षे मुदत होती. राष्ट्रीय बँका, एलआयसी, पोस्ट आदी शासकीय कार्यालयांकडून मिळणारा परतावा साडेसहा ते सात टक्क्यांपर्यंत असल्याने गुंतवणूकदारांनी मैत्रेय कंपनीत मोठ्या रकमा गुंतविल्याचे नित्याप्रमाणे काही गुंतवणूकदार बुधवारी सकाळीच कंपनीच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हा कार्यालयाला टाळे असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. अकरा वाजले तरी एकही कर्मचारी कार्यालयाकडे फिरकला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांची बेचैनी वाढली. ४मैत्रेयला टाळे लागल्याची वार्ता वाऱ्यासारखी सर्व गुंतवणूकदारांमध्ये पोहोचली आणि कार्यालयासमोर एकच गर्दी उसळली. कार्यालयास कुलूप असल्याचे पाहून आता आपले पैसे बुडाले, असे म्हणत शेकडो गुंतवणूकदार आणि कंपनीच्या एजंटस्नी दिवसभर कार्यालयासमोर ठिय्या दिला. काही गुंतवणूकदारांनी उस्मानपुरा ठाण्यात धाव घेतली. कार्यालयाची तोडफोड होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त नेमला.