शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात महायुतीचा जल्लोष

By admin | Updated: May 27, 2014 01:00 IST

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांचा अधिकृत समावेश झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांचा अधिकृत समावेश झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी समर्थकांनी जल्लोष साजरा केला. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सायंकाळी ६ वाजेपासून जिल्ह्यात अनेकजण दुरचित्रवाणीसमोर बसून शपथविधी सोहळा आतुरतेने बघत होते. दानवे यांचा शपथविधी बघण्याची उत्सुकता महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही लागली होती. सायंकाळी ७.१८ वाजता दानवे यांचा शपथविधी सुरू झाला, तेव्हा अनेकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गांधीचमन चौकात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत घोषणाबाजीही केली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर, अ‍ॅड. संजीव देशपांडे, विनायक देहेडकर, वंदना कुलकर्णी, अरूणा जाधव, अतुल वझरकर, सिध्दी विनायक मुळे, महेश जोशी, अ‍ॅड. विपुल देशपांडे, शिवराज जाधव, रवींद्र देशपांडे, चंद्रशेखर मोहरील, सुहास वैद्य, राजेश जोशी आदी उपस्थित होते. भोकरदनमध्येही जल्लोष दानवे यांचा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथविधी सुरू असताना भोकरदन तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ठिकठिकाणी फटाके वाजवून गुलालाची उधळण करण्यात आली. जालना जिल्ह्याला व भोकरदन तालुक्याला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळाल्याने सर्वसामान्य लोकांमधून आनंद व्यक्त करण्यात आला. काही गावांमध्ये घरोघर पेढे वाटण्यात आले. जाफराबाद तालुक्यातही अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथमच संधी मिळत असल्याने आता अनेक विकास कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी) दिल्लीतही समर्थकांचा जल्लोष दानवे यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त दिल्ली येथे गेलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबरच जिल्ह्यातील महायुतीतील नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही जल्लोष साजरा केला. यावेळी दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे, पुत्र संतोष दानवे तसेच माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, श्रीरंग साळवे, आ. संतोष सांबरे, आ. हर्षवर्धन जाधव, माजी आ. सांडू पाटील लोखंडे, नामदेव गाडेकर, संदीपान भुमरे, किशोर अग्रवाल, शिवाजीराव थोटे, पंडितराव भुतेकर, भास्कर दानवे, रामेश्वर भांदरगे, देवीदास देशमुख, वीरेंद्र धोका, राजेंद्र देशमुख, रमेश पांडे, प्रकाश गव्हाड, मुकेश पांडे, शालिकराम म्हस्के, कमलाकर साबळे, नाना भागिले, संतोष लोखंडे, भाऊसाहेब जाधव, अशोक गरूड, सुरेश बनकर, इद्रिस मुलतानी, शिवाजी पाथ्रीकर, नारायण कुचे, सुनील मिरकर, ज्ञानेश्वर मोटे, राजेंद्र जैस्वाल, सांडू वाघ, रमेश मुरकुटे, गणेश इंगल, विष्णू डोंगरे, राजेश जोशी, जयेश प्रसाद, सुरेश शर्मा, विजय कड, भूषण शर्मा, भाऊसाहेब काकडे, धर्मराज शेवाळे आदी उपस्थित होते.