शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे अधिकारी अद्याप झोपेतच!

By admin | Updated: November 26, 2014 01:08 IST

जालना : शहरातील नवीन जालना भागातही अनेक ठिकाणी विद्युत तारांवर आकडे टाकून सर्रासपणे वीज चोरी करण्यात येत असल्याचा प्रकार मंगळवारी निदर्शनास आला.

जालना : शहरातील नवीन जालना भागातही अनेक ठिकाणी विद्युत तारांवर आकडे टाकून सर्रासपणे वीज चोरी करण्यात येत असल्याचा प्रकार मंगळवारी निदर्शनास आला. कन्हैय्यानगर भागात तर वीज चोरी करणाऱ्या घरांच्या रांगाच आढळून आल्या. काही उच्चभू्र घरांमध्येही वीज चोरी होत असल्याचे धक्कादायक प्रकार आढळून आले.‘लोकमत’ च्या हॅलो जालना अंकातून मंगळवारी जुना जालन्यातील वीज चोरीसंदर्भातील ‘स्टींग आॅपरेशन’ चे वृत्त प्रकाशित होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. ज्या ठिकाणी आकडे आहेत, ते कायम होते. सायंकाळपर्यंत एकाही ठिकाणी छापा मारलेला नव्हता. महावितरणचे भरारी पथक आजही गायब होते. लोकमत चमूने सकाळी ११ वाजता दर्गावेस भागास भेट दिली. तेथे दोन-तीन व्यावसायिकांनीही तारांवर आकडे टाकलेले होते. लोधी मोहल्ला, मंगळबाजार, रामनगर, गांधीनगर, पेन्शनपूरा या भागात अनेक ठिकाणी घरातून तारांवर आकडे टाकण्यात आलेले होते. हा प्रकार अनेक दिवसांपासून होत असल्याचे या भागातील काही नागरिकांनी सांगितले.वीज चोरीमुळे महावितरणचे दरमहा लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले जात आहे. रामनगर, संभाजीनगर, गांधीनगर, कन्हैय्यानगर, पेन्शनपुरा या भागात काही दुमजली इमारतींमध्येही वीज चोरी होत असल्याचे आढळून आले. (समाप्त)वीज वितरण कंपनीचे काही अधिकारी व बहुतांश कर्मचारी शहरातच राहतात. उघडपणे होणारी ही वीज चोरी त्यांच्या निदर्शनास येत नसेल तर नवलच म्हणावे लागेल. एकीकडे सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत असताना दुसरीकडे कानाडोळा कशासाठी ? असा संतप्त सवाल काही वीज ग्राहकांनी केला.४मीटर रिडींग घेणाऱ्या एजन्सीकडून अनेकवेळा रिडींग न घेता अंदाजित बिले दिली जातात. एखाद्या वेळी मग रिडिंगनुसार बिल दिले जाते. परंतु त्यामुळे वीज ग्राहकांचे दरमहा खर्चाचे बजेट कोलमडते. या बाबीकडे का लक्ष दिले जात नाही, असा सवालही वीज ग्राहकांमधून होत आहे.