औरंगाबाद जिल्हा काँग्रेस- राष्ट्रवादी मुक्त; सेनेला झाला मोठा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:14 PM2019-10-25T18:14:26+5:302019-10-25T18:17:00+5:30

७५ वर्षीय हरिभाऊ बागडे यांना काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी कडवी झुंज दिली; पण बागडे नाना पुरून उरले.

Maharashtra Assembly Election 2019 : Aurangabad District Congress - NCP Free; Great gain for Shiv sena | औरंगाबाद जिल्हा काँग्रेस- राष्ट्रवादी मुक्त; सेनेला झाला मोठा लाभ

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस- राष्ट्रवादी मुक्त; सेनेला झाला मोठा लाभ

googlenewsNext

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद जिल्ह्यात नऊ मतदारसंघ असून, यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स फारच वाईट राहिला. त्यामुळे त्यांचा एकही आमदार निवडून येऊ शकलेला नाही. अब्दुल सत्तार यांच्या रूपाने सिल्लोडची जागा  शिवसेनेच्या खात्यावर गेली. मागच्या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून लढले. ते पराभूत झाले. पण शिवसेनेच्या तिकिटावर लढलेले उदयसिंग राजपूत हे निवडून आले. 

पैठणमधून विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांनी विजयश्री मिळविली. त्यांचेच सहकारी असलेल्या दत्ता गोर्डे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढविण्यात आले. त्यामुळे संजय वाघचौरे हे नाराज झाले. राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर यांची वैजापूरची जागा त्यांचे पुतणे अभय पा. चिकटगावकर यांनी लढवली; पण ती राखण्यात त्यांना यश आले नाही. 

फुलंब्रीतून यावेळी काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे हे येतील, असा अंदाज व्यक्त होत होता; परंतु विधानसभेचे अध्यक्ष असलेले हरिभाऊ बागडे यांनी चिवट झुंज दिली व ते पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहत विजयी झाले. औरंगाबाद पूर्व, मध्य आणि पश्चिम या मतदारसंघांतही रंगतदार लढती झाल्या. पूर्वमध्ये डॉ. गफार कादरी यांनी जोरदार मुसंडी मारली होती. पण तेथे भाजपचे अतुल सावे विजयी झाले. पश्चिममध्ये अपक्ष राजू शिंदे यांच्यामुळे सेनेसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या; परंतु तेथे सेनेचे संजय सिरसाट विजयी झाले. एमआयएमला मध्यमधील आपली जागा राखण्यात यश आले नाही.

ठळक मुद्दे 
1. ७५ वर्षीय हरिभाऊ बागडे यांना काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी कडवी झुंज दिली; पण बागडे नाना पुरून उरले. यावेळी ते पराभूत होतील, हा अंदाज खोटा ठरला.
2. लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसचे  असलेले अब्दुल सत्तार हे सिल्लोडमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले.  
3. दरवेळी मराठा नेतृत्वातील फाटाफुटीचा फायदा घेऊन गंगापूरमधून भाजपचे प्रशांत बंब निवडून येतात. यावेळी त्यांना अशी संधी न देता शिवसेनेतून आलेले संतोष माने यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे करण्यात आले. तरीही बंब विजयी झाले.
4. खूप गाजावाजा होऊनही वंचित बहुजन आघाडीला कुठेच विजय मिळविता आलेला नाही.  
5. एमआयएमचा २0१४ मध्ये एक आमदार निवडून आला होता. यावेळी ३ उमेदवार उभे करूनही पराभव पत्करावा लागला.

निवडून आलेले उमेदवार

भाजप
1.  औरंगाबाद पूर्व -अतुल सावे
२. फुलंब्री - हरिभाऊ बागडे 
3. गंगापूर - प्रशांत बंब
शिवसेना
1. औरंगाबाद मध्य  - प्रदीप जैस्वाल
2. औरंगाबाद पश्चिम   - संजय शिरसाट
३. सिल्लोड - अब्दुल सत्तार
४. पैठण - संदीपान भुमरे
५. वैजापूर - प्रा. रमेश बोरनारे
६. कन्नड - उदयसिंग राजपूत

पक्षनिहाय आमदार
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : Aurangabad District Congress - NCP Free; Great gain for Shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.