शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे प्रेमीयुगुल फुलंब्री पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: August 20, 2014 00:59 IST

फुलंब्री : मुंबई येथून फरार झालेल्या प्रेमीयुगुलाला फुलंब्री पोलिसांनी शिताफीने पकडले व मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले.

फुलंब्री : मुंबई येथून फरार झालेल्या प्रेमीयुगुलाला फुलंब्री पोलिसांनी शिताफीने पकडले व मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. संजय दगडू मोटे हा २१ वर्षीय तरुण पिशोर येथील रहिवासी आहे. तो काही वर्षांपासून नेरूळ मुंबई येथे एका हॉटेलवर कामाला लागला. नजीकच राहणाऱ्या एका सतरा वर्षीय युवतीसोबत त्याचे सुत जुळले. १४ आॅगस्ट रोजी दोघे तेथून फरार झाले. १६ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ते दोघे फुलंब्री टी पॉर्इंटवर फिरत असताना त्यांना रात्री गस्तीवरील पोलिसांनी अटक केली. आम्ही दोघे बहीण-भाऊ आहोत, अशी खोटी माहिती देत पळून जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता पोलिसांना संशय आला. पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, जमादार आसाराम आगळे यांनी पोलिसाचा खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी सर्व माहिती सांगितली. फुलंब्री पोलिसांनी याची माहिती नेरूळ पोलीस ठाण्यात दिली. तेथे मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली होती. दुसऱ्या दिवशी नेरूळ पोलिसांनी फुलंब्रीत येऊन त्या प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतले.