शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

लगीनघाईत पुढाऱ्यांची होतेय दमछाक

By admin | Updated: May 10, 2015 00:19 IST

शेषराव वायाळ , परतूर लगीनघाईत पुढाऱ्यांची चांगलीच दमछाक होत असून प्रत्येकाच्या खिशात ३० ते ३५ लग्न समारंभाची यादी असल्याने कुठे लग्न,

शेषराव वायाळ , परतूर लगीनघाईत पुढाऱ्यांची चांगलीच दमछाक होत असून प्रत्येकाच्या खिशात ३० ते ३५ लग्न समारंभाची यादी असल्याने कुठे लग्न, क ुठे वागींसा, तर कुठे भेटीवर पुढाऱ्यांना भागवावे लागत आहे. यावर्षी लग्नतिथी कमी असल्याने एकाच तिथीवर मोठया संख्येने लग्न व इतर समारंभ येत आहेत. या मुळे या लग्न समारंभाला उपस्थिती लावताना पुढाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. प्रत्येकाच्या खिशात ३० ते ३५ लग्न समारंभाची यादी असल्याने प्रत्येक विवाह सोहळयास उपस्थिती लावणे शक्य नाही. त्यामुळे पुढारी दिवसभरात या सोहळ्यातील कुठल्या तरी एका विधीस हजेरी लावत आहेत. इतकी धावपळ करूनही सर्वच लग्नास भेटी देणे शक्य देता येणे शक्य नाही. तर, मोबईलवरूनही शुभेच्छा देण्याचा मार्ग शोधून काढण्यात आला आहे. या लग्नसराईच्या भेटीगाठीत विवाह सोहळयास भेट देण्याबरोबरच नुकतीच विधान लढवून एकमेकावर आरोप - प्रत्यारोप करणारे उमेदवारही एकमेकांना भेटत आहेत. बऱ्याच विवाह सोहळयात या सर्व उमेदवारांचा एकत्र बसून गप्पाही मारण्याचा योग येत आहे. यामध्ये पालकमंत्री बबनराव लोणीकर, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, सभापती बाबासाहेब आकात या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचा समावेश आहे. तर काँग्रेसचे अ‍ॅड. अन्वर देशमुखही या सोहळ्यांना हजेरी लावतांना दिसत आहेत. यामध्ये ऐनवेळी विधानसभा निवडणूकीत ‘एन्ट्री’ करणारे सोमनाथ साखरे, प्रा. राजेश सरकटे, निवास चव्हाण हे मात्र दिसेनासे झाले आहेत. पुढाऱ्यांच्या या हजेरीतून बरेच विनोदी किस्सेही घडत आहेत. हे सर्व एकत्र बसल्यावर कोण कोणाला भेटले, निवडणुकीनंतर कोणी कोणाशी जुळवून घेतले, आता निवडणूका झाल्या विकासाठी एकत्र येवू, कोणाचे काय चालले यावर टोमणेबाजी करून मार्मिक चर्चेच्या फ ैरी झडत आहेत. या सर्वांच्या आगमनाने वधू किंवा वर पित्याचीही चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. पुढाऱ्यांच्या विविध सोहळ्यांना लागत असलेल्या या हजेरीवरून व तेथे त्यांच्यात झडत असलेल्या चर्चेच्या फेऱ्यांवरून विविध अंदाज लावणाऱ्यांचीही कमी नाही. याबरोबरच पुढारीही कोणी कोणाला मतदान केले हे विसरून विवाह सोळयांना हजेरी लावत आहेत. या विवाह सोहळयांच्या अवाक्याबाहेरील तिथींना तोंड देण्यासाठी पुढाऱ्यांची मुले व सौभाग्यवतीही हजेरी लावून वधू व वर पित्याचे समाधान करीत आहेत. कितीही प्रयत्न केला तरी, प्रत्येक पुढारी प्रत्येक सोहळयास हजेरी लावू शकत नाही, यामध्ये मंदाताई लोणीकर, जि. प. सदस्या अशाताई आकात, माजी नगराध्यक्षा विमलताई जेथलिया, माजी. जि. प. उपाध्यक्ष राहूल लोणीकर, पं. स. सदस्य कपिल आकात, नितीन जेथलिया यांचा समावेश आहे.