शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

५५ परिचारिकांवर भार

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

हिंगोली : रूग्ण आणि डॉक्टरांमधील दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिचारिकांना वाढत्या रिक्त जागांचा फटका सोसत अतिरिक्त कामाचे ओझे पेलावे लागते.

हिंगोली : रूग्ण आणि डॉक्टरांमधील दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिचारिकांना वाढत्या रिक्त जागांचा फटका सोसत अतिरिक्त कामाचे ओझे पेलावे लागते. सलग दोन शिफ्टही कराव्या लागतात. रिक्त जागा ५0 च्या वर असताना १५ पदांची मंजुरी मागितली गेलीे. तीही पूर्ण होईल, याची शाश्वती नाही. २०० बेडचे रूग्णालयात प्रत्यक्षात ५५ परिचारिकांच्या भरवशावर चालत आहे.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार रामभरोसे असल्याने रूग्ण सरळ जिल्हा रूग्णालयात धाव घेतात. संख्या वाढल्याने दर्जा वाढून १०० वरून २०० बेडवर रूग्णालय गेले. त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे जुन्याच १०० बेडवर दीडशेच्यावर रूग्ण अ‍ॅडमीट असतात. संख्येने अधिक असणाऱ्या रूग्णांची सेवा हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच संख्येतील परिचारिकांना करावी लागते. एकूण सव्वाशेच्या जवळपास पदे मंजूर असताना केवळ ३२ पदे कायमस्वरूपी भरण्यात आली आहेत. अन्य १३ परिचारिका कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. प्रामुख्याने सुट्टी, रजा आदी कामांच्या निमित्ताने बहुतांश परिचारिका रजेवर असतात. उर्वरित परिचारिकांमधून तिन्हीही वेळत कर्तव्यावर हजर राहणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असते. त्यांना बाह्यरूग्ण विभागासह १७ विभागाचे काम पाहवे लागते. सकाळ, संध्याकाळ डॉक्टरांच्या राऊंडनंतर रूग्णांची पूर्ण काळजी त्यांनाच घ्यावी लागते. साफसफाईपासून ते औषधी देण्यापर्यंतच्या काम करावे लागते. दरम्यान, डॉक्टर नसल्यास नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. बाहेरील लोक वरिष्ठांऐवजी परिचारिकांना जाब विचारतात. विभाग वाढले, बेडची संख्या शंभराहून दोनशेवर गेली. दिवसेंदिवस काम वाढत असताना पुरेशा संख्येअभावी रूग्णांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत. अतिरिक्त ताणामुळे परिचारिकांवर आजारी पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथे परिचारिकांची भरती करणे गरजेचे बनले. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)