राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:54 AM2019-01-18T00:54:32+5:302019-01-18T00:54:47+5:30

कन्नड येथे १८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर झाला आहे. २० जानेवारीदरम्यान रंगणाºया या स्पर्धेत राज्यभरातील ३३ जिल्ह्यांतील ४५० खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पदाधिकारी सहभागी होत आहेत. या स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

List of Aurangabad district teams for state level youth fencing competition | राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर

राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर

googlenewsNext

औरंगाबाद : कन्नड येथे १८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर झाला आहे. २० जानेवारीदरम्यान रंगणाºया या स्पर्धेत राज्यभरातील ३३ जिल्ह्यांतील ४५० खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पदाधिकारी सहभागी होत आहेत.
या स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचा संघ (मुले) : दुर्गेश जहागीरदार, तुषार आहेर, हेमंत शिंदे, आकाश कल्याणकर, मयूर हिरे, प्रथमेश तुपे, अभिषेक देशमुख, अभय शिंदे, इर्शाद सय्यद, निखिल वाघ.
मुलींचा संघ : वैदेही लोहिया, हर्षदा वडते, कशिश भराड, संस्कृती पडूळ, अपूर्वा रसाळ, स्नेहल पाटील, पूजा गुंडे, वेदिका जाधव, ऋतुजा मुंबरे, पायल अवचार, आरती गायकवाड, अमृता दामले. मार्गदर्शक : अजय त्रिभुवन.
राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मानसिंह पवार, सचिव पी. के. निकम, अशोकराव आहेर, प्राचार्य विजय भोसले, उपप्राचार्य भाऊसाहेब मगर, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अशोक गिरी, अभय देशमुख, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, दिनेश वंजारे, रामचंद्र इडे, शिवाजी हुसे, प्रा. डॉ. एच. के. देशमुख, प्रवीण शिंदे, राकेश खैरनार, स्वप्नील तांगडे, सागर मगरे आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: List of Aurangabad district teams for state level youth fencing competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.