शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

शाळा खोल्यांवरील पत्रे उडाले

By admin | Updated: June 30, 2014 00:35 IST

घाटनांदूर : येथून जवळच असलेल्या मैंदवाडी जिल्हा परिषदशाळेची व अंगणवाडी इमारतीची दुरवस्था झाली आहे.

घाटनांदूर : येथून जवळच असलेल्या मैंदवाडी जिल्हा परिषदशाळेची व अंगणवाडी इमारतीची दुरवस्था झाली आहे. येथील शाळा खोल्यांचे दरवाजे खिडक्या मोडल्या आहेत. अंगणवाडी इमारतीवरील पत्रे उडून गेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावे लागत आहेत.मैंदवाडी जिल्हा परिषदेची शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. येथील एकाही शाळा खोलीला दरवाजा नाही, पट मोडलेले आहेत. खिडक्या तुटलेल्या असून खोल्यावरील पत्र्यांची खिळापट्टी निघून गेली आहे. तोच प्रकार अंगणवाडी इमारतीबाबत असून वादळी वाऱ्यात अंगणवाडीवरील पत्रे उडून गेले आहेत. शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर मोकाट कुत्रे, गुरांचे वास्तव्य पहावयास मिळते. घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर पसरले आहे.विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत असून दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवूनही परळी पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सरपंच अरुण होळंबे यांनी केला आहे. चारही वर्गखोल्यांची दुरवस्था झाल्याची माहिती मुख्याध्यापक राठोड यांनी दिली. शाळा दुरुस्तीसाठी तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा सरपंच होळंबे यांच्यासह ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. (वार्ताहर)विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करायचे कसे ?मागील अनेक दिवसांपासून मैंदवाडी जि. प. शाळेच्या व अंगणवाडीच्या इमारतीचे काम झालेले नाही. चिमुकल्या विद्यार्थ्यांना भंगार खोल्यांमध्येच ज्ञानार्जन करावे लागत आहे. या शाळेच्या खोल्यांना असणारे दरवाजे मोडून पडले आहेत. तसेच शाळा खोल्यांवरील पत्रे उडून गेले आहेत. अशा परिस्थितीत येथील विद्यार्थ्यांना ऊन पावसाचा सामना करत ज्ञानार्जन करावे लागत आहे.