शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

विधानपरिषद निवडणूक : १७५ पोस्टल मते ठरली बाद ; विजयाचा कोटा ठरणे अद्याप बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 4:38 PM

Vidhan Parishad Election, Marathwada : मराठवाडा रिअल्टर्स प्रा. लि. चिकलठाणा येथे सकाळी ८ वा. मतमोजणीस सुरुवात

ठळक मुद्देवैध मतांच्या बेरजेनंतर ठरणार विजयाचा कोटामतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार मोजणीसाठी दोन हॉलमध्ये ५६ टेबल कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीसाठी मतमोजणी

औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मंगळवारी मतदान केल्यानंतर आता मतमोजणीची उत्सुकता लागलेली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली असून सध्या पोस्टल मतांची मोजणी सुरु आहे. पोस्टलच्या एकूण १२४८ पैकी १७५ मते बाद झाली आहेत. १०७३ मतांची मोजणी सुरू आहे. महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा प्रचार या निवडणुकीत झाल्यामुळे मतदारांनी कोणत्या समीकरणांचा स्वीकार केला आहे, हे निकालावरून स्पष्ट होणार आहे. 

विजयाचा कोटा अद्याप निश्चित झाला नाही. ५६ टेबलवर मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार असून त्यामध्ये वैध मतांची बेरीज करून पहिल्या पसंतीच्या मतानुसार विजयी होण्यासाठी कोटा ठरेल. वैध मतांच्या संख्येला दोनने भागून त्यात १ अधिक केल्यानंतर जी संख्या येईल, ती संख्या विजयासाठी कोटा म्हणून निश्चित करण्यात येईल. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होताच सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिका या एका दहा बाय दहाच्या मिक्सिंग ड्रममध्ये टाकण्यात आल्या आहेत. त्यानंतर दोन सभागृहांमध्ये प्रत्येकी २८ टेबलवर २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे मोजणी करण्यात येईल. हे करीत असतानाच वैध मतपत्रिका काढण्यात येतील. त्यानंतर ३५ उमेदवारांच्या पसंतीनुसार मतपत्रिका पिजन बॉक्समध्ये वर्ग करण्यास सुरुवात होईल. येथूनच खरी मतमोजणी सुरू होईल. या सगळ्या प्रक्रियेला रात्री ८ वाजेपर्यंत वेळ लागेल. तोपर्यंत वैध मतांचा कोटा आणि विजयासाठी लागणाऱ्या एकूण मतदानाचा आकडा समोर येईल. 

कोटा पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या पसंतीसाठी मोजणीविजयी मतांचा कोटा पहिल्या फेरीत पूर्ण झाला नाहीतर दुसऱ्या पसंतीची मतमोजणी (नेक्स्ट अव्हेलेबल प्रीफे्रंस) सुरू करण्यात येईल. यात ३३ उमेदवारांचे ईलीमेनेशन सुरू होईल. दोन उमेदवारांपैकी ज्याचा कोटा पूर्ण होईल. तो विजयी होईल. समान मते मिळाल्यास टॉस करून निर्णय घेतला जाईल. १ हजार मतपत्रिकांमागे  १ सुपरवायझर, ३ सहायक कर्मचारी असतील. पहिली पसंती आणि थेट तिसरी पसंती दिलेली असेल तर सदरील मतपत्रिका एक्झहॉस्टेड ठरविण्यात येईल.  

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादVidhan Parishadविधान परिषदMarathwadaमराठवाडा