नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वावरच शिक्कामोर्तब्ब

By Admin | Updated: May 9, 2016 23:54 IST2016-05-09T23:50:27+5:302016-05-09T23:54:10+5:30

अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाई दुष्काळी परिषदेचे औचित्य साधत केज विधानसभा मतदारसंघात नमिता अक्षय मुंदडा याच कै. डॉ. विमल मुंदडा यांच्या वारसदार आहेत,

On the leadership of Namita Mundada, | नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वावरच शिक्कामोर्तब्ब

नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वावरच शिक्कामोर्तब्ब

अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाई
दुष्काळी परिषदेचे औचित्य साधत केज विधानसभा मतदारसंघात नमिता अक्षय मुंदडा याच कै. डॉ. विमल मुंदडा यांच्या वारसदार आहेत, असे शिक्कामोर्तब्ब करीत पक्षांतर्गत विरोधकांना चपराक देत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यापुढे नव्या चेहऱ्यांच्या पाठीशी आपली ताकद उभा करण्याची ही त्यांची नवी खेळी अनेकांची धाकधुक वाढविणारी ठरली.
दुष्काळाच्या निमित्ताने अंबाजोगाईत दुष्काळ पषिद झाली. ही परिषद दुष्काळाऐवजी राकाँमधील गटा-तटानेच नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या स्मरणात राहिली. दुष्काळी परिषदेच्या निमित्ताने पक्षातील नवीन चेहऱ्यांच्या पाठीशी ताकद उभा करण्याचा अजित पवारांचा डाव या निमित्ताने समोर आला. नमिता अक्षय मुंदडा, अक्षय मुंदडा, जि. प. चे सभापती संदिप क्षीरसागर, युद्धजित पंडित, जयदत्त धस हे नवे चेहरे व्यासपीठावर होते.
पवारांनी केज विधानसभा मतदार संघ व कै. डॉ. विमल मुंदडा यांचे नेतृत्व हे समीकरण दृढ झाले होते. याची आठवण उपस्थितांना करून देत विमलतार्इंच्या कार्याचा वारसा त्यांच्या सूनबाई नमिता मुंदडा समर्थपणे पुढे नेत असल्याचा उल्लेख आवर्जुन केला. अक्षय मुंदडा, नंदकिशोर मुंदडा हा परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी काम करीत असल्याचे ठणकावून सांगितले. असे सांगत असतांना अजित पवारांनी या परिसरातील पक्षातील अनेकांचे नाव घेणे टाळले.
जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे. पुढारी व कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. मात्र, पक्षांतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात असल्याने याचा फटकाही पक्षाला निवडणुकीत सहन करावा लागला, याची आठवण करून देत केज विधानसभा मतदार संघात नमिता मुंदडा यांच्या नेत्तृत्वावर शिक्कामोर्तब्ब केल्याची चर्चा दोन दिवसापासून तालुक्यात रंगत आहे.

Web Title: On the leadership of Namita Mundada,