गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला, यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मे २०१४ मध्ये ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख, प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. २००९-१० या काळात ते कुलसचिव तसेच २००६ ते २०१० काळात विभागप्रमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य होते. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यासोबत त्यांनी अखेरपर्यंत काम केले. सध्या ते शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर कार्यरत होते. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. याच पक्षाच्या वतीने २००४ मध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सध्या एमजीएम विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागात ते संशोधक संचालक म्हणून कार्यरत होते. जवखेडा (ता. कन्नड) येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. काचोळे हे सध्या खोकडपुरा येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंगल, दोन मुली, जावई व असा परिवार आहे.
शेतकरी संघटनेचे नेते, शास्त्रज्ञ डाॅ. मानवेंद्र काचोळे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला, ...
शेतकरी संघटनेचे नेते, शास्त्रज्ञ डाॅ. मानवेंद्र काचोळे यांचे निधन
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}