शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीला ठेंगा ; प्रशासन सुस्त !

By admin | Updated: October 29, 2014 00:45 IST

लातूर : शहर महानगरपालिकेच्या विकासासाठी राज्य शासनाने नोव्हेंबर २०१२ मध्ये लागू केलेल्या स्थानिक संस्था कर वसुलीचा आकडा दोन वर्षे लोटले तरीही वाढायला तयार नाही़

लातूर : शहर महानगरपालिकेच्या विकासासाठी राज्य शासनाने नोव्हेंबर २०१२ मध्ये लागू केलेल्या स्थानिक संस्था कर वसुलीचा आकडा दोन वर्षे लोटले तरीही वाढायला तयार नाही़ व्यापाऱ्यांची नाराजी दुर करून कराचे दर कमी करणाऱ्या लातूर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी प्रयत्नच केले नसल्याने करदात्यांचा आकडा वाढायला तयार नाही़ मनपात नोंद असलेल्या एकूण व्यावसायिकांपैकी केवळ १०० ते १२५ व्यावसायिक सध्या या कराचा भरणा करीत आहेत़ यावर मनपाचे अधिकारी धन्यता मानत आहेत़ विशेष म्हणजे एलबीटी विभागाची जबाबदारी नेमकी कोणाकडे अद्याप हा गुंताही मनपात कायम आहे़ लातूर शहर महापालिकेत एलबीटीच्या विषयांवर गेल्या दोन वर्षांत अनेकदा वादंग झाला़ व्यापाऱ्यांचा विरोध वाढल्यानंतर मनपा आयुक्तांनी एका निवृत्त अधिकाऱ्यांना निमंत्रित करून व्यापाऱ्यांची कार्यशाळा घेतली़ या कार्यशाळेत कर भरण्याची पद्धती व्यापाऱ्यांना सांगण्यात आली होती़ याशिवाय एलबीटीचे दरही कमी करण्यात आल्याने व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी कर भरण्यास होकारही दिला होता़ त्यानंतर व्यापाऱ्यांची नोंदणी वाढेल, शहराच्या विकासात एलबीटीचा मोठा वाटा राहील, असा कांगावा करणाऱ्या प्रशासनाच्या उदासिनतेमुळे शहरात वसुली वाढली नाही़ उलट प्रारंभी कर भरणा करीत असलेल्या व्यावसायिकांपैकी अनेक जणांनी भरणा बंद केला आहे़ एलबीटी वसुलीची जबाबदारी सोपविण्यासाठी प्रारंभी मनपा प्रशासनाकडे अधिकाऱ्यांचा अभाव होता़ नवे अधिकारी रूजू झाल्यावर एलबीटीची जबाबदारी उपायुक्तांकडे सोपविण्यात आली़ मात्र, कर्मचाऱ्यांचा तुटवडा, वसुलीविषयी प्रशासनाची असलेली अनास्था यामुळे एलबीटी वसुलीचा विषय रखडला आहे़ नांदेड येथून लातूर मनपात रूजू झालेल्या सहाय्यक आयुक्त यांना एलबीटीचा दांडगा अनुभव असल्याची चर्चा होती़ दीड महिन्यांपूर्वी लातूर शहर महापालिकेतील एलबीटीची जबाबदारी सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांच्याकडे देण्यात आली असली तरी अद्याप पूर्णपणे कारभार त्यांच्या हाती सोपविण्यात आलेला नाही़ जुनेच कर्मचारी अजूनही आपणच त्या प्रक्रियेत असल्याचे व्यापाऱ्यांना दाखवून देत आहेत़ शहर विकासासाठी एलबीटीचा उपयोग होईल, याचा कांगावा करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता त्याचा विसर पडला आहे़ व्यापाऱ्यासोबत कडक भूमिका घ्यायची कोण? असा प्रश्न प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही भेडसावत असल्याची चर्चा आहे़ राज्य शासनाने एलबीटीचा निर्णय रद्द केलेला नाही़ त्या त्या महापालिकांनी स्थानिक संस्था कर घ्यायचा की व्हॅट यावर निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे़ लातूर मनपाने यावर शासनाला मत मागविले मात्र त्याला उत्तरही मिळाले नाही़