शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

लातूर आगाराची सव्वाआठ कोटींची ‘दिवाळी

By admin | Updated: November 6, 2014 01:35 IST

’बाळासाहेब जाधव , लातूर एस.टी. महामंडळाच्या वतीने एस.टी.च्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रवासी वाढवा अभियानासह दिवाळीनिमित्त जादा गाड्यांची सोय करून

 

’बाळासाहेब जाधव , लातूर
एस.टी. महामंडळाच्या वतीने एस.टी.च्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रवासी वाढवा अभियानासह दिवाळीनिमित्त जादा गाड्यांची सोय करून एस.टी.च्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून एकादशी ते नवमी या १४ दिवसांच्या कालावधीत लातूर विभागाला ८ कोटी २४ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
बहुजन हिताय, बहुजन सुखाय... या ब्रीदवाक्याने सेवा देणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने विभाग नियंत्रक डी.बी. माने यांच्या मार्गदर्र्शनाखाली प्रवासी वाढवा अभियान, सुरक्षित व सुखकर प्रवासाची हमी व महत्वपूर्ण सणानिमित्त जादा गाड्यांची सोय प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे. यामध्ये आषाढी एकादशी, गणेशोत्सव, कपिलधार यात्रा, दिवाळी या कालावधीत जादा गाड्यांची सोय लातूर विभागाच्या वतीने केली जाते. याच धर्तीवर एकादशी ते नवमी या १४ दिवसांच्या कालावधीत जादा बसेसची सोय करण्यात आली. उदगीर आगाराच्या माध्यमातून दिवाळीच्या कालावधीत ७ लाख ९ हजार किलोमीटर्सच्या माध्यमातून २ कोटी १८ लाखांचे उत्पन्न मिळाले. उदगीर आगारातून ६ लाख १७ हजार किलोमीटर्सच्या प्रवासातून १ कोटी ९३ लाख, अहमदपूर आगारातून ४ लाख ८० हजार किलोमीटर्सच्या प्रवासातून १ कोटी ४६ लाख, निलंगा आगाराच्या माध्यमातून ४ लाख ६१ हजार किलोमीटर्सचा प्रवास पूर्ण करून १ कोटी ४५ लाख, औसा आगाराच्या माध्यमातून ४ लाख ४ हजार किलोमीटर्सच्या प्रवासातून १ कोटी २२ लाख, लातूर आगाराच्या माध्यमातून ७ लाख ९ हजार किलोमीटर्सच्या माध्यमातून २ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी लातूर विभागातून दिवाळीच्या कालावधीत २५ लाख २५ हजार कि.मी.च्या माध्यमातून ७ कोटी ४६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर २०१४ या चालू वर्षाच्या कालावधीत २६ लाख ५६ हजार कि.मी.च्या माध्यमातून लातूर विभागाला ८ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीपेक्षा यंदा ७८ लाखांचे उत्पन्न जास्त झाले आहे.
एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने दीपावलीच्या कालावधीत गतवर्षी २६ आॅक्टोबर रोजी २५ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. या माध्यमातून ५५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये मिळालेल्या उत्पन्नामुळे एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या उत्साहात वाढ झाल्याने यावर्षी २६ आॅक्टोबर रोजी ४० बसेसची सोय करण्यात आली. यातून ६७ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न पुणे येथे सुरू करण्यात आलेल्या जादा बसेसच्या माध्यमातून मिळाले आहे.
बीड जिल्ह्यातील कपिलधार यात्रेस बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेला लातूरहून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने एस.टी. महामंडळाच्या वतीने कपिलधार यात्रेसाठी लातूर-१०, उदगीर-८, अहमदपूर-८, निलंगा-६, औसा-७ अशा एकूण ४० बसेसची सोय करण्यात आली आहे. तसेच एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात केली जात असल्याचे विभाग नियंत्रक डी.बी. माने म्हणाले.