शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेकरूंचा शेवटचा जथा मंगळवारी रवाना

By admin | Updated: September 17, 2014 01:15 IST

औरंगाबाद : पवित्र हज यात्रेसाठी मराठवाड्यातील २३३० यात्रेकरू रवाना झाले. मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजता २३३ यात्रेकरूंना घेऊन शेवटचे विमान जेद्दाहकडे रवाना झाले.

औरंगाबाद : पवित्र हज यात्रेसाठी मराठवाड्यातील २३३० यात्रेकरू रवाना झाले. मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजता २३३ यात्रेकरूंना घेऊन शेवटचे विमान जेद्दाहकडे रवाना झाले. यात्रेकरूंच्या परतीचा प्रवास १९ आॅक्टोबरपासून सुरू होणारआहे.मराठवाड्यातील हज यात्रेकरूंचा प्रवास ७ सप्टेंबरपासून सुरू झाला. दररोज २३३ यात्रेकरू एका विमानाद्वारे जात होते. मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातील यात्रेकरू रवाना झाले. विभागातील सर्व यात्रेकरूंना थांबण्यासाठी ऐतिहासिक जामा मशीद येथे व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेकरूंना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी स्वयंसेवक आणि मरकज- ए- हुजाज कमिटीकडून घेण्यात येत होती. यात्रेकरूंच्या सर्व कागदपत्रांची तपासणी, सामानाची तपासणी, चलन बदलणे, ‘अहराम’ (पांढरे कपडे) बांधणे आदी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलीहोती. आज शेवटचे विमान रवाना होणार असल्याने जामा मशीद येथे सकाळी यात्रेकरूंच्या नातेवाईकांनी अलोट गर्दी केली होती. नातेवाईकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी जामा मशिदीजवळील रस्ते बॅरिकेड लावून बंद केले होते.यात्रेकरूंसह बसमध्ये बसताच अनेक नातेवाईकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. पवित्र हज यात्रा ४० दिवसांची असते. यात्रेकरू सुखरूप यावेत हीच प्रार्थना नातेवाईकांसह आप्तस्वकीय करीत होते. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व यात्रेकरू चिकलठाणा विमानतळात दाखल झाले. मराठवाडा आणि आसपासच्या जिल्ह्यातील हज यात्रेकरूंना पूर्वी मुंबई येथून विमानाने यात्रेला जावे लागत होते. यात्रेकरूंची ही गैरसोय लक्षात घेऊन २००५ मध्ये शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी थेट औरंगाबादहून विमानसेवा सुरू केली. तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या सहकार्याने औरंगाबादहून विमानसेवा सुरू झाली.राजेंद्र दर्डा यांच्याकडून शुभेच्छा!राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सायंकाळी चिकलठाणा विमानतळावर सर्व यात्रेकरूंची भेट घेतली.यात्रेकरूंना हज यात्रा सुखरूप व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मरकज- ए- हुजाज कमिटीचे करीम पटेल उपस्थित होते.