शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून ग्रामपंचायतीला कुलूप

By admin | Updated: July 21, 2016 01:09 IST

मस्सा (खं.) : रस्ते, नाल्यांसह आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरल्याचे सांगत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी १७ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आहेत.

मस्सा (खं.) : रस्ते, नाल्यांसह आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरल्याचे सांगत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी १७ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आहेत. तीन दिवसांचा कालावधी लोटूनही ना वरिष्ठ अधिकारी फिरकले ना ग्रामसेवक. त्यामुळे बुधवारीही ग्रामपंचायत कुलूपबंदच होती. कळंब तालुक्यातील मस्सा खंडेश्वारी गावातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अशीच अवस्था नाल्यांचीही आहे. ग्रामपंचायतीकडून नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाणीपुरवठ्याची परिस्थितीही काही समाधानकारक नाही. उपरोकत प्रश्नांची सोडवणूक करण्यात ग्रामपंचायत सफशेल अपयशी ठरल्याचे सांगत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी १७ जुलै रोजी चक्क ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. या आंदोलनानंतर किमान ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी अथवा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी गावात जावून ग्रामपंचायत कार्यालय उघडणे अपेक्षित होते. पंरतु, तसे झाले नाही. तीन दिवसांचा कालावधी लोटूनही ग्रामपंचायत कार्यालयाकडे ना पदाधिकारी फिरकले ना अधिकारी. त्यामुळे कार्यालयाचे कुलूप बुधवारीही कायम होते. या प्रकाराबाबत ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. (वार्ताहर)