शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

गल्लीबरोबरच दिल्लीकडेही लक्ष..!

By admin | Updated: May 16, 2014 00:16 IST

पंकज कुलकर्णी , जालना जालना शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे गल्लीतून दिल्लीकडेच लक्ष असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

पंकज कुलकर्णी , जालना जालना शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे गल्लीतून दिल्लीकडेच लक्ष असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून १६ व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे जसजसे निकालाचे चित्र समोर येत जाईल, तसतसे दिल्लीच्या तख्तावर कोण विराजमान होईल, हे स्पष्ट होणार आहे. सुरूवातीपासूनच या निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता होती. सोशल नेटवर्किंगसह सर्वांच्याच हातात असलेल्या स्मार्टफोननेही त्यात भर टाकली. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकांविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, पाठोपाठ प्रचाराची रणधुमाळी उडाली. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. जालना व परभणी लोकसभा मतदारसंघात १७ व २४ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यंदा मतदानाची टक्केवारीही मोठ्या प्रमाणात वाढली. वाढीव टक्का कोणाच्या पथ्यावर पडेल याविषयी मतदानाच्या दुसर्‍या दिवशीपासूनच चर्चा सुरू झाली होती. मतदान झाले. मतदानानंतर परभणी लोकसभेच्या निकालंसाठी महिनाभराची तर जालनेकरांना तब्बल २२ दिवसांची प्रतीक्षा करावी लागली. या दरम्यान उमेदवार आकडेमोडीत रमले. शहरातील चौका-चौकात तर ग्रामीण भागातील पारा-पारावर निवडणुकीच्याच गप्पा रंगत होत्या. या गप्पांमधून स्थानिक उमेदवारापेक्षा दिल्लीच्या आकडेवारीवरच सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले होते. गल्लीतही दिल्लीच्या गप्पा व राजकीय समिकरणे कशी होतील, राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, केंद्रात नंतरच्या टप्प्यात झालेल्या आकडेवारीवरून तेथील जागांचा अंदाज बांधण्यात येत होता. त्यातच दोन-तीन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या ‘एक्झीट पोल’मुळे तर या चर्चांना अधिकच रंगत आली. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कार्यकर्ते छातीठोकपणे आपलाच उमेदवार निवडून येईल, यांचेच सरकार येईल, असे दावे-प्रतिदावे करत होते. ग्रामीण भागातील पारापासून ते शहरातील चौका व व्यापार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैजाही लावल्या गेल्या आहेत. यातून कोट्यावधी रूपयांची देवाण-घेवाण होणार असल्याची चर्चा बाजारपेठेत ऐकावयास मिळत आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीविषयी गाव, वस्ती, वाडी-तांड्यावरील मंडळीही थेट दिल्लीच्या सत्तेवर चर्चा करत आहे. ‘गुड फ्रायडे’ कुणासाठी? १६ मे लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजेपासूनच शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक टीव्हीसमोर ठाण मांडून बसणार हे निश्चित. योगायोगाने या दिवशी शुक्रवार असल्यामुळे हा ‘फ्रायडे’ नेमका कोणासाठी ‘गुड’ ठरणार हे आता काही तासातच कळणार आहे. निवडणूक निकालांविषयी तरुणांसह आबालवृद्धांमध्ये मोठी उत्सुकता पहावयास मिळत आहे.