शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

कोळगाव बँकेत शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी होतेय हेळसांड

By admin | Updated: June 30, 2014 00:36 IST

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागत आहे.

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागत आहे. वारंवार खेटे घालूनही पीक कर्ज वेळेवर मिळत नसल्याने ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून कोळगावसह खडकी, माणकापूर, टाकळगव्हाण, तांदळा, काजळा, साठेवाडी, बंगाली पिंपळा, तिंतरवनी आदी वीस ते बावीस गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. पीक कर्जासाठी या बँकेत तब्बल महिनाभर शेतकऱ्यांना खेटे घालावे लागत असल्याचे तुकाराम घाडगे यांनी सांगितले. या बँकेतून शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्रही वेळेवर दिले जात नाहीत. यासाठीही शेतकऱ्यांना चार ते पाच तास बँकेत ताटकळत बसावे लागत असल्याचे सुनील धस यांनी सांगितले. या बँकेतून गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते. असे शेतकरी सध्या आपल्या घेतलेल्या पीक कर्जाचे नवे- जुने करीत आहेत. शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळावा यासाठी ३० जून अगोदर शेतकरी पीक कर्ज भरण्याची घाई करीत आहेत. वेळेत पीक कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनाही पुन्हा कर्ज देण्यासाठी बँकेकडून टाळाटाळ केली जात असल्याचे गुलाब लोंढे यांनी सांगितले. पीक कर्ज भरल्यानंतर पुन्हा कर्जासाठी शेतकऱ्यांना तब्बल वीस ते पंचेवीस दिवस थांबावे लागत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज द्यावे व बेबाकी प्रमाणपत्रही तात्काळ देण्याची मागणी रायगड संघटनेचे रितेश ढगे, सुनील शेरकर, संतोष काळे, जिजा करांडे, शाम पाटील यांनी केली. या संदर्भात बँकेचे व्यवस्थापक तांदळे म्हणाले, नियमानुसार कर्जवाटप सुरू आहे. (वार्ताहर)कोळगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून वीस ते बावीस गावातील शेतकऱ्यांना दिले जाते पीककर्ज.पीक कर्ज भरल्यानंतरही नवीन कर्जासाठी शेतकऱ्यांना थांबावे लागते वीस ते पंचवीस दिवस.तात्काळ कर्ज देण्याची मागणी.