शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

शहर प्रदूषणाच्या विळख्यात...

By admin | Updated: December 7, 2015 01:05 IST

राजकुमार जोंधळे ल,लातूर लातूर जिल्ह्यात रेशनच्या निळ््या रॉकेलचा काळा बाजार होत असल्याचे लोकमतने स्टींग आॅपरेशनव्दारे उघडीकीस आणले आहे. शहरात टमटम, आॅटोरिक्षा,

राजकुमार जोंधळे ल,लातूरलातूर जिल्ह्यात रेशनच्या निळ््या रॉकेलचा काळा बाजार होत असल्याचे लोकमतने स्टींग आॅपरेशनव्दारे उघडीकीस आणले आहे. शहरात टमटम, आॅटोरिक्षा, ट्रक आणि दुचाकींमध्ये आता बिनधास्तपणे निळ््या रॉकेलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. परिणामी अख्खे शहर आता प्रदुषणाच्या विळख्यात अडकल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याला पायबंद घालणारी यंत्रणा मात्र निष्क्रय ठरली असून, प्रत्येक शहरात प्रदुषण रोखणारी ‘पीयूसी’ यंत्रणा बंधनकारक आहे. शहरात मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे वर्षभरात एकदाही पीयूसी मोहिम राबविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.लातूर शहरातून खेड्या-पाड्यांतील वेगवेगळ््या मार्गावर धावणाऱ्या काळी-पिवळी प्रवासी वाहनांतूनही या रॉकेलचा वापर होत असल्याचे पुढे आले आहे. शहरातील वेगवेगळ््या भागात, चौकातून या काळी-पिवळी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करतात. याकडे संबंधित प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. यातील कांही वाहनांत इंधन म्हणून रॉकेलचा वापर होतो, याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना असते, कारवाई मात्र केली जात नाही.ट्रकमध्येही रॉकेलचा वापर...शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या आॅटो आणि टमटममध्येही निळ््या रॉकेलाचा इंधन म्हणून सर्रासपणे वापर होत आहे. याकडे संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. शहरात दरदिन १५०० अ‍ॅटो हे अधिकृत प्रवासी वाहतूक करतात. मात्र यातील ३५० आॅटो चालकांकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना आहे. तर उर्वरित आॅटोचालकांनी खाजगी परवाने घेतले आहेत. यातील कांही आॅटोत इंधन म्हणून चक्क निळ््या रॉकेलचा वापर केला जात आहे.याबाबत संबंधित प्रशासनाकडून डोळेझाक होतेय. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने विविध स्वरुपाचे खटले दाखल केले जातात. महिन्याकाठी ८५ ते १०० खटले या वाहनधारकांवर दाखल केले जातात. त्यांच्याकडून दंडापोटी रोख रक्कम वसूल केली जाते. मात्र रॉकेल वापरावर कारवाई केली जात नसल्यामुळे प्रदुषण वाढत आहे़ त्यामुळे काळी-पिवळी, टमटम, आॅटो, ट्रक चालकांचे फावत असून, प्रदूषणाला खतपाणी मिळत आहे़