शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

बस उलटून एक ठार; २२ जखमी

By admin | Updated: May 26, 2015 00:50 IST

कन्नड : कन्नड आगाराची सिल्लोड-कन्नड बस सोमवारी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास कोळसवाडी गावाच्या अलीकडे उलटल्याने एक प्रवासी महिला ठार, तर २२ जण जखमी झाले.

कन्नड : कन्नड आगाराची सिल्लोड-कन्नड बस सोमवारी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास कोळसवाडी गावाच्या अलीकडे उलटल्याने एक प्रवासी महिला ठार, तर २२ जण जखमी झाले.ठगनाबाई भाऊलाल भगुरे (६५), रा. नाचनवेल, ता. कन्नड ही महिला मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. कन्नड आगाराची सिल्लोड-कन्नड बस (क्र. एम एच-२०-डी-९९२४) सोमवारी दुपारी कन्नडकडे येत असताना कोळसवाडी गावाच्या अलीकडे अभयारण्यातील चिचबारीजवळ रस्त्याच्या बाजूस उलटली. त्यानंतर बसने दोन पलट्या खाल्ल्याचे प्रवाशांनी सांगितले. बस रस्त्यापासून सुमारे ३० फूट खोलवर पलटी झाली. बस पलटी झाल्याने एकच हाहाकार उडाला. बसमधून बाहेर पडण्यासाठी सर्वच प्रवाशांनी जिवाच्या आकांताने प्रयत्न केले. त्याच रस्त्याने पाठीमागून येणाऱ्या बसमधून सर्व जखमी प्रवाशांना कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. गंभीर जखमी तुळसाबाई लोहार, कमल परदेशी, रेखा परदेशी, भास्करराव शेळके, किशोर भिसे, नारायण उपळकर, चालक इब्राहीम शहा, अस्माखान, सुलोचना चौथमल, जनार्धन मोकासे, कमलबाई रमेश परदेशी, गोविंद सरोदे यांना उपचारार्थ त्वरीत घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले.शीतल संजय जाधव (१७), संगीता संजय जाधव (३५), सुलोचना कडूबा चौथमल (६०), नारायण उपळकर (५५), दगडचंद किसन सोनवणे (३८), सर्व रा. पिशोर, किशोर दगडू भिसे (२५), रा. बोरगाव बाजार, ता. सिल्लोड, तुळशीराम उमाजी अंभोरे (७१), रा. सिल्लोड, गोविंद सरोदे (७१), रा. देवगाववाडी, ता. सिल्लोड, अतिक खान (२५), अस्माखान (२५), वंदना मोहन शेवाळे (२६) सर्व रा. मालेगाव, योगिता शिवाजी मोतिंगे (३०) रा. बनशेंद्रा, पूजा गणपत सोनवणे (१३), खामगाव, ता. फुलंब्री, बळीराम उत्तम भोसले (३८), रा. आडगाव (पि), जनार्धन भाऊराव मोकासे (६०), रा. पिशोर, भास्कर पंडितराव शेळके (६०), रा. टाकळी, कमलबाई रमेश परदेशी (६०), रा. कुराड, ता. पाचोरा, रेखा प्रताप परदेशी (६०), रा. चाळीसगाव, कमल गोकुळ परदेशी (६०), रा. भराडी, तुळसाबाई शामलाल लोहार (४५), रा. कुराड, ता. पाचोरा, वाहक रत्नाकर विठ्ठल ताठे (५०), रा. देवपूळ, ता. कन्नड, इब्राहिमशहा मुन्सी (चालक) (४०), रा. नाचनवेल, ता. कन्नड अशी जखमींची नावे आहेत.घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक ए. ए. सिद्दीकी पोलीस लवाजम्यासह होते. आगारप्रमुख एल. व्ही. लोखंडे हेही अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी, तसेच ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस करीत होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवगावकर, प्रवीण पवार, विशाल बेंदरे व प्रशांत कोंडेकर यांनी जखमींवर उपचार केले.