शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

जि़प़त भाजपा सत्तेबाहेर जाणार

By admin | Updated: September 9, 2014 23:59 IST

अनुराग पोवळे, नांदेड विधानसभा निवडणुकीपूर्वीच होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आता अन्य पक्षांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापनेच्या हालचाली करीत आहे़

अनुराग पोवळे,  नांदेडविधानसभा निवडणुकीपूर्वीच होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आता अन्य पक्षांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापनेच्या हालचाली करीत आहे़ अडीच वर्षांपूर्वी सत्ता स्थापनेत आघाडीला मदत करणाऱ्या भाजपाला व चिखलीकर गटाला मात्र यावेळी सत्तेतून बाहेर राहण्याची वेळ येणार आहे़नांदेड जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसकडे अध्यक्षपद राहणार आहे़ जिल्हा परिषदेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसचे २५, काँग्रेस सहयोगी २, राष्ट्रवादी पक्षाचे १८, शिवसेनेचे ९, भाजपाचे ४, चिखलीकर गट अर्थात तत्कालीन लोकभारतीचे ४ आणि भारिप १ सदस्य आहे़ त्याचवेळी उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे आहे़ यावेळीही काँग्रेस पक्षाचाच अध्यक्ष होणार हे निश्चित़ अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव अध्यक्षपदासाठी बळीरामपूर गटातून निवडून आलेल्या मंगलाताई गुंडिले आणि करखेली गटातील काँग्रेस सदस्या सिंधुताई कमळेकर यांच्यात रस्सीखेच सुरू आहे़ यातही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काँगेस धर्माबाद तालुक्याला प्रथमच अध्यक्षपद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़ गुंडिले यांच्याकडूनही प्रयत्न केला जात आहे़ त्यात माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांचा शब्द अंतिम राहणार आहे़ एकूण ६३ सदस्यसंख्या असलेल्या जि़प़त सत्तास्थापनेसाठी ३२ सदस्यांची गरज राहणार आहे़ काँग्रेस २५, सहयोगी २ आणि राष्ट्रवादीचे १८ असे एकूण ४५ असे स्पष्ट बहुमत आघाडीकडे आहे़ त्यामुळे अन्य पक्षांची मदत यावेळी काँग्रेसला उरली नाही़ परिणामी सत्तेत सहभागी असलेल्या भाजपाला मात्र यावेळी सत्तेबाहेर रहावे लागणार आहे़दुसरीकडे उपाध्यक्षपद सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाईक गटाकडे आहे़ त्यामुळे आगामी काळात उपाध्यक्षपद हे धोंडगे गटाला देण्याची मागणी पुढे आली आहे़ हे उपाध्यक्षपद देतानाही आगामी विधानसभेच्या दृष्टीनेच रणनिती निश्चित केली जात आहे़ विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीला मोठे महत्व आले आहे़ अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेदरम्यान काँग्रेसने राष्ट्रवादीसह लोकभारती अर्थात चिखलीकर गट, भाजपासह अपक्षांची मदत घेतली होती़ या सत्तास्थापनेदरम्यान भाजपालाही एक सभापतीपद मिळाले होते़ तसेच चिखलीकर गटालाही प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या रूपाने सभापतीपद मिळाले होते़मात्र मागील कालावधीत घडलेल्या राजकीय घडामोडी आणि आगामी विधानसभेच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा एक गट अप्रत्यक्षरित्या सत्तेबाहेरच आहे़ त्या गटालाही यावेळी सत्तेत सामावून घेण्याच्या दृष्टीने काँग्रेसकडून हालचाली सुरू आहेत़ यात आणखी एक सभापतीपद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीनंतर होणाऱ्या सभापती निवडणुकीत काँग्रेसला २ आणि राष्ट्रवादीला २ सभापतीपद देवून जि़ प़ तील समीकरण समतोल करण्याचा प्रयत्न राहणार आहे़ उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीच्या धोंडगे गटाकडून दिलीप धोंडगे यांच्यासह विद्यमान सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांचेही नाव आहे़ तर सभापतीपदासाठी मुदखेड तालुक्यातील मुगट गटाचे रोहिदास जाधव, बाबूराव गिरे, जयश्री पावडे, वर्षा भोसीकर, वंदना लहानकर, मोहन पाटील टाकळीकर, दिनकर दहिफळे, बंडू नाईक आदींची नावे पुढे आली आहेत़ (प्रतिनिधी)