शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जिनिंगला आग; २५ लाखांची हानी

By admin | Updated: June 24, 2014 00:06 IST

हिंगोली : शहराजवळील एमआयडीसी भागात रविवारी मध्यरात्री १ च्या सुमारास राधा जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीला आग लागली.

हिंगोली : शहराजवळील एमआयडीसी भागात रविवारी मध्यरात्री १ च्या सुमारास राधा जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीला आग लागली. या आगीमध्ये यंत्रसामुग्री, कापूस व गाठी जळाल्याने अंदाजे २० लाखाचे नुकसान झाले आहे.एमआयडीसीमध्ये अशोक द्वारकादास मुंदडा यांच्या मालकीची राधा जिनिंग व प्रेसिंग आहे. रविवारी रात्री त्या ठिकाणी काम सुरू असताना अचानक कापसासोबत गारगोटी जाऊन मशीनमध्ये फुटल्यानंतर ठिणगी पडून कापसाला आग लागली. ही बाब लक्षात येताच कामगारांनी जिनिंगच्या आवारातील उपलब्ध पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हिंगोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंबही मागविण्यात आला होता. रात्रीची वेळ असल्याने आणि आग चोहोबाजूने पसरल्याने ती विझविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांसह जिनिंगच्या कामगारांना यश आले. आगीत कापसावर प्रक्रियेसाठी जिनिंगमध्ये बसविलेली यंत्रसामुग्री जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच जिनिंगमध्ये साठविलेला कापूस व तयार केलेल्या गाठी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून एकुण अंदाजे २५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती जिनिंगचे मालक अशोक मुंदडा यांनी दिली. हिंगोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, पोलिस निरीक्षक दिलीप थोंबळ, सपोउपनि एन. आर. राठोड, पोना शेख शकील यांनी नुकसानीची पाहणी केली. याबाबत हनुमानदास मुंदडा यांच्या माहितीवरून ग्रामीण ठाण्यात नोंद झाली.(प्रतिनिधी)यंत्रसामुग्री भस्मसातहिंगोली येथील एमआयडीसीमध्ये अशोक द्वारकादास मुंदडा यांच्या मालकीची राधा जिनिंग व प्रेसिंग आहे. रविवारी रात्री त्या ठिकाणी काम सुरू असताना अचानक आग लागली. कामगारांनी जिनिंगच्या आवारातील उपलब्ध पाणी टाकून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.