शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

चिंताजनक! जायकवाडी धरण गाळात; साठवण क्षमता १०२ वरून ८७ टीएमसीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 6:29 PM

‘मेरी’च्या अहवालावर १२ वर्षांनंतरही कारवाई होईना; प्रशासनाची उदासीनता

- दादासाहेब गलांडेपैठण : येथील जायकवाडी धरणात गाळासह वाळू मोठ्या प्रमाणात आल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता १०२ टीएमसीवरून ८७ टीएमसीवर आल्याचा अहवाल नाशिकच्या ‘मेरी’ या संस्थेने २०१२ मध्ये दिला असताना या अहवालावर गेल्या १२ वर्षांमध्ये काहीही कारवाई झाली नसल्याची बाब समोर आली आहे.

जायकवाडी धरणाचे काम १९६५ मध्ये सुरू झाले. १९७६ मध्ये पूर्ण झाल्यानंतर येथे पाणी साठवण्यास सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, पैठण, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासे तालुक्यातील मिळून ११८ गावांमधील ३४ हजार १०५ हेक्टर क्षेत्रात धरणाचा परिसर आहे. धरणाचा आकार हा बशीप्रमाणे आहे. या धरणाचा नाशिक येथील ‘मेरी’ (महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) या राज्य शासनाच्या संस्थेने रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून २०१२ मध्ये सर्व्हे केला होता. या सर्व्हेत धरणात १५ टीएमसी गाळ असल्याने धरणाची साठवण क्षमता १०२ टीएमसीवरून ८७ टीएमसीवर आल्याची बाब समोर आली होती. हा अहवाल ‘मेरी’ शासनाला सादर केला होता. त्यानुसार या धरणाची साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी शासन स्तरावरून पावले उचलणे आवश्यक असताना काहीही कारवाई झालेली नाही. ‘मेरी’च्या सर्व्हेनंतर धरणातील गाळ १५ टीएमसीवरून आणखी वाढला आहे. सध्या धरणात फक्त ९.६३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातील गाळ काढणे सोपे आहे; परंतु शासकीय पातळीवरून अद्यापही याबाबत काहीही हालचाली दिसून येत नाहीत.

पक्षी अभयारण्यामुळे निर्णय शासन स्तरावरच१० ऑक्टोबर १९८६ रोजी हे जायकवाडी जलाशयाचे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे धरणातील गाळ उपसण्याचा निर्णय शासन स्तरावरूनच निर्णय घ्यावा लागेल, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.

धरणातील गाळ, वाळू काढावीदरवर्षी पाण्यासोबत विविध घटक वाहत धरणात येतात. त्यामुळे धरणात आज रोजी ३० टक्के गाळ, वाळू जमा झाली असेल. धरणातील गाळ शेतकऱ्यांना द्यावा, तसेच वाळूचीही विक्री करावी. जेणेकरून शासनाला महसूल मिळेल आणि धरणाची साठवण क्षमता पूर्वीप्रमाणे वाढेल.- प्रा. संतोष गव्हाणे, पर्यावरण अभ्यासक

शेतकऱ्यांना विनामूल्य गाळ द्यावाजलसंपदा विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना विनामूल्य गाळ दिल्यास शेकडो शेतकरी आपल्या शेतात धरणातील गाळ स्वखर्चाने नेतील. या गाळामुळे शेतकऱ्यांची नापीक जमीन सुपीक बनेल. तसेच जमिनीचा पोत सुधारून उत्पन्नात वाढ होईल.-दीपक मोरे, शेतकरी

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र