औरंगाबाद : शिवसेनेत मध्य मतदारसंघाच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू झालेली असतानाच आज विद्यमान आ. प्रदीप जैस्वाल यांनी संतापून पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देत शहर प्रगती आघाडीचा बिगुल वाजविला. त्याची चर्चा सेनेत गटागटाने सुरू झाली आहे. मध्यमधून उमेदवारी मिळविण्यासाठी स्पर्धेमध्ये असलेल्या इतर इच्छुकांनी या चर्चेसाठी अथक परिश्रम घेतल्याचा सूर आ. जैस्वाल गटाकडून आळविण्यात आला आहे. सिडकोमध्ये सेनेच्या एका बैठकीत आघाडीवरून मोठे वादळ उठले. या वादळामुळे सेनेतील अंतर्गत खलबतांना वेग आला आहे. विद्यमान आ. प्रदीप जैस्वाल, माजी आ. किशनचंद तनवाणी, सहसंपर्क सुहास दाशरथे, महापौर कला ओझा, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले हे मध्य मतदारसंघातून उमेदवारीसाठी चर्चेतील नावे आहेत. शिवसेनेने जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांतील मेळावे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाकडून काही दगाफटका होऊ नये. यासाठी यंत्रणा सक्षम करण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ९ मतदारसंघांतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मेळावे होणार आहेत. याच दिवशी मध्य मतदारसंघाचा गट, शाखा, विभागप्रमुखांचा मेळावा होणार आहे. त्या तयारीसाठी आ. जैस्वाल यांनी आज बैठक घेतली.
शहर प्रगती आघाडीचा बिगुल वाजविण्याचा जैस्वालांचा प्रयत्न
By admin | Updated: September 11, 2014 01:24 IST
औरंगाबाद : शिवसेनेत मध्य मतदारसंघाच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू झालेली असतानाच आज विद्यमान आ. प्रदीप जैस्वाल यांनी संतापून पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देत शहर प्रगती आघाडीचा बिगुल वाजविला.
शहर प्रगती आघाडीचा बिगुल वाजविण्याचा जैस्वालांचा प्रयत्न
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}