शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण प्रकरणी जालना एलसीबीने एकास उचलले

By admin | Updated: November 17, 2015 00:32 IST

बीड : व्यापाऱ्यास लुटमार करून त्याचे अपहरण व खंडणी उकळण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपीस ९ नोव्हेंबर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले होते.

बीड : व्यापाऱ्यास लुटमार करून त्याचे अपहरण व खंडणी उकळण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपीस ९ नोव्हेंबर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले होते. या पाच गुन्हेगारांच्या सहाव्या साथीदारास गुन्हे शाखेने बीड येथून सोमवारी अटक केली आहे.दरम्यान त्या पाचही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.जालना येथील नवीन मोढ्यातील आडत व्यापारी आशिष आनंद सेठिया यांच्या जवळील मोठी रक्कम लुटून त्यांचे अपहरण करण्याचा बेत बीड येथील पाच अट्टल गुन्हेगारांनी रचला होता. ते ९ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास नवीन मोढा ते भोकरदन नाका रस्त्यावर टाटासुमो वाहनात दबा धरून बसलेल्या या आरोपींना वरकड हॉस्पीटल समोरील मोकळ्या जागेत सापळा लावून जेरबंद करण्यात आले होते. त्यात अन्वर खान मिर्झा खान उर्फ गुजर (३२ रा. इंद्रप्रस्थ कॉलनी बीड), शेख वसीम शेख वजीर (२६ रा. ढगे कॉलनी,अशोकनगर बीड), सय्यद नासेर सय्यद महेबूब (२४ रा.बालेपीर भरतभूषण क्षीरसागर नगर,बीड), सय्यद अहमद सय्यद महेबुब (२५ रा. संजयनगर गॅस गोडावून समोर जालना), व शेख उबेद शेख बाबु (२५ बागल नाक्या जवळ बीड) या पाच जणांना समावेश होता. त्यांच्या ताब्यातून टाटासुमो, एक तलवार, एक चाकु, दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले होते.याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आणखी दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.त्याची मुदत संपल्याने या आरोपींना सोमवारी पून्हा न्यायालयात हजर केले असता त्याना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान याप्रकरणी बीड येथून आणखी एका आरोपीस अटक करण्यात आले आहे. अलिम अहेमद जलील अहेमद असे त्याचे नाव आहे. (प्रतिनिधी)