शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जालना नगरीत अवतरली पंढरी...

By admin | Updated: July 10, 2014 01:04 IST

जालना : आषाढी एकादशीनिमित्त शहरवासियांचे दैवत समजले जाणाऱ्या आनंदी स्वामी महाराज यांची पालखी मिरवणूक बुधवारी काढण्यात आली.

जालना : आषाढी एकादशीनिमित्त शहरवासियांचे दैवत समजले जाणाऱ्या आनंदी स्वामी महाराज यांची पालखी मिरवणूक बुधवारी काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे जुना जालना भाग ‘भज गोविंदम् भज गोपाल’ च्या घोषाने दुमदुमला होता. जालन्यात पंढरीच अवतरली होती. सकाळी ८ वाजता आनंदी स्वामी महाराज यांची पालखी मिरवणूक निघाली. मिरवणुकीसमोर औरंगाबाद येथील धर्मसंग्राम क्रीडा मंडळाने विशेष ढोल-ताशाची मोफत व्यवस्था केली होती. दादाराव उस्ताद व देवराव उस्ताद यांच्या आखाड्यातील मल्लांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर करून लोकांचे लक्ष वेधले. तुळजापूर येथील संस्कार भारती मंडळाचे पारंपरिक गोंधळ नृत्य हेही सर्वांचे आकर्षण ठरले. जय बजरंग व्यायाम शाळेच्या मल्लांनीही आपली प्रात्यक्षिके सादर केली. लाड गवळी समाजाच्या महिला भजनी मंडळाने विविध भजने सादर केली. तर आनंदीस्वामी भक्त मंडळाचे सेवेकरी टाळ-मृदंगाच्या गजरात ‘भज गोविंदम् भज गोपाल’ चा गजर करीत होते. पालखी ज्या मार्गावरून जात होती, तेथे सुवासिनींकडून ओवाळण्यात येत होते. महिला-पुरूष, युवक-युवती चौकाचौकात दर्शनासाठी प्रतीक्षा करीत होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सेवेकऱ्यांसाठी तसेच उपस्थित भाविकांसाठी ठिकठिकाणी वैयक्तिकरित्या, विविध मंडळे, संस्था, संघटनांच्या वतीने मोफत चहा, पाणी, फराळाची व्यवस्था केली होती. ही पालखी शनिमंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, शास्त्री मोहल्ला, मार्गे बाजार चौकी येथे आली. या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने परंपरेप्रमाणे मंदिराचे पुजारी रमेश महाराज ढोले यांच्यासह आखाडेप्रमुख व प्रतिष्ठित नागरिकांचे स्वागत करण्यात आले. मोरंडी मोहल्ला, कसबा, माळीपुरा, गांधी चमन, टाऊनहॉल मार्गे रात्री ९.३० वाजता परत मंदिरात पोहोचली. आनंदीस्वामी यात्रा महोत्सवानिमित्त शनिमंदिर ते गांधीचमन तसेच आनंदीस्वामी रोड परिसरात विविध स्टॉलवर आबालवृद्धांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. वाहतूक पोलिसांनी मिरवणुकीच्या मार्गावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहतूक बंद केली होती. (प्रतिनिधी)‘भज गोविंदम् भज गोपाल’ चा गजरया पालखी मिरवणुकीचे मुस्लिम समाजाच्या वतीने बाजार चौकी येथे स्वागत करण्यात आले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, एकबाल पाशा, शाह आलमखान, शेख अख्तर, अय्यूबखान, पो.नि. अनिल विभूते, सतीश बदादे, विष्णूअप्पा सतकर, गणेश सुपारकर आदी उपस्थित होते.