शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरात जयभीम कविसंमेलन रंगणार

By admin | Updated: March 28, 2016 00:06 IST

जालना : येथील ‘साहेब बना अभियान’ अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीनिमित्त १ एप्रिल रोजी जयभीम कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती

जालना : येथील ‘साहेब बना अभियान’ अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीनिमित्त १ एप्रिल रोजी जयभीम कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक अ‍ॅड. कैलास रत्नपारखे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. अ‍ॅड. रत्नपारखे म्हणाले की, गत पाच वर्षांपासून डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या प्रबोधनपर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यंदा १ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे संमेलन होत आहे. याचे उद्घाटन नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक रविचंद्र हडसनकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राज्य शिक्षण परिषदेचे संचालक महावीर माने उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी भारत कदम, लाचलुचपत प्रतिबंधकचे उपअधीक्षक प्रवीण मोरे, विस्तार अधिकारी स्रेहलता सोळुंके, डॉ. मीना सूर्यवंशी, सुभाष म्हस्के यांची उपस्थिती राहणार आहे. या कविसंमेलनात डॉ. अनिल काळबांडे, प्रा. बसवराज कोरे, शम्स जालनवी, अ‍ॅड. प्रशांत आर्सुड, सुहास पोतदार, सुलक्षणा लांडगे, विजय जाधव, वर्षा वटावकर, अच्युत मोरे, मनीषा कबाडे, डॉ. देवीदास पाटोळे, देविका पारखे आदी कवी आपल्या कसदार कविता यावेळी सादर करणार आहेत. गत पाच वर्षांपासून हे संमेलन यशस्वी होत आहे. यंदाही प्रसिद्धी कवी आपल्या परिवर्तनवादी कविता सादर करणार आहेत. दरम्यान, अ‍ॅड. रत्नपारखे यांनी मराठवाडा साहित्य संमेलन पुढे ढकलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला व संमेलन एकत्रच येत आहेत. व्याख्यानमालेस ३७ वर्षे झाली असून, जुनी व्याख्यानमाला आहे. त्याचबरोबर छोटी छोटी राज्ये व्हावीत असेही मत रत्नपारखे यांनी व्यक्त केले. प्रशासकीय दृष्ट्या नियंत्रण ठेवणे सुलभ जाऊ शकते, असेही रत्नपारखे म्हणाले. (प्रतिनिधी)