शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रूणहत्या रोखण्यासाठी वर्षभर जागर अधिकार्‍यांची कार्यशाळा

By admin | Updated: January 12, 2015 14:16 IST

स्त्री- भ्रूण हत्या रोखण्यासाठी आता जिल्ह्यात वर्षभर जागर होणार आहे. त्यासाठी 'बेटी बढाओ, बेटी पढाओ' या मोहीमेच्या माध्यमातून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी बालिका जन्मोत्सव भरविला जाणार आहे.

बीड : स्त्री- भ्रूण हत्या रोखण्यासाठी आता जिल्ह्यात वर्षभर जागर होणार आहे. त्यासाठी 'बेटी बढाओ, बेटी पढाओ' या मोहीमेच्या माध्यमातून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी बालिका जन्मोत्सव भरविला जाणार आहे, अशी माहिती लेक लाडकी अभियानच्या अँड. वर्षा देशपांडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात अल्पवयीन विवाह, कुषोषण, शाळाबाह्य मुली, छेडछाड असे विविध प्रश्न आहेत. काही महिलांच्या अत्याचाराची नोंद होत नाही. नोंद झाली तर शिक्षेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आता प्रभावी उपाय हवेत, असेही अँड. देशपांडे यांनी सांगितले. २६ जानेवारीला गावागावात होणार्‍या ग्रामसभेतून स्त्री जन्माच्या स्वागताचे ठराव घेतले जाणार आहेत. ग्रामआरोग्य व पोषण समित्यांच्या मदतीने आता महिला जन्माचे स्वागत होण्यासाठी कृतीआराखडा तयार आहे. या कार्यक्रमांचा समावेशस्त्री- भ्रूण हत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती सर्वदूर पोहोचविण्यात येणार आहे. सासू- सून मेळावे, स्त्री- पुरुष समानता, स्त्री जन्माचे स्वागत, गरोदर मातांना गर्भलिंगनिदान चाचणी न करण्याची शपथ घेणे, गावांमध्ये आकडे बोलतात अशी पाटी लावून स्त्री, पुरुष जन्मदाराच्या नोंदी करणे, एक किंवा दोन आपत्यांवर थांबणार्‍या माता- पित्यांचा गौरव करणे, मुलींसाठी रांगोळी, एकाच बाळावर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करणे आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

अधिकार्‍यांची कार्यशाळा ■ 'बेटी बढाओ, बेटी पढाओ' या मोहिमेंतर्गत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा झाली. जिल्हाधिकारी राम, अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, सीईओ नामदेव ननावरे, सीएस डॉ. अशोक बोल्डे, डीएचओ डॉ. एच. व्ही. वडगावे, अतिरिक्त सीईओ नईमोद्दीन कुरेशी, डेप्युटी सीईओ एन. ए. इनामदार यांची उपस्थिती होती. अँड. वर्षा देशपांडे यांनी मार्गर्शन केले