शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

१५ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन

By admin | Updated: September 7, 2014 00:24 IST

अहमदपूर : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत तालुक्यातील १५ अंगणवाडी केंद्रांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे़ त्यामुळे आता या केंद्रातून चिमुकल्यांना आणखीन दर्जेदार शिक्षण मिळणार आहे़

अहमदपूर : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत तालुक्यातील १५ अंगणवाडी केंद्रांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे़ त्यामुळे आता या केंद्रातून चिमुकल्यांना आणखीन दर्जेदार शिक्षण मिळणार आहे़ तालुक्यातील लांजी, मावलगाव, केंद्रेवाडी, वळसंगी, शिवणखेड, उंबरगा कोर्ट, शिरूर ताजबंद, थोरलेवाडी, महादेववाडी, धानोरा बु़, सताळा, मोळवन, सांगवी, टेंभूर्णी या गावातील अंगणवाड्या ह्या गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि दानशूर गावकऱ्यांच्या मदतीने लोकसहभागातून सुसज्ज करण्यात आले आहे़ या अंगणवाड्यांतील जागेची सजावट, स्वच्छता आदींची पाहणी प्रशांत जोशी यांच्या पथकाने महिनाभरापूर्वी केली होती़ या पथकामध्ये नितीन पाटील, अजय पाटील, रमेश पालवे, गोपाळ यादव यांचा समावेश होता़ या पथकाने पूर्व प्राथमिक शिक्षण, लोकसहभाग याची पाहणी केली होती़ तसेच किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची चौकशी करून मुलाखती घेतल्या होत्या़ या तपासण्यानंतर १५ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळाल्याचे पत्र औरंगाबादचे प्रमुख प्रशांत जोशी यांच्याकडून एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाला मिळाले आहे़ या अंगणवाड्यांच्या माध्यमातून शिक्षणाबरोबर अन्य चांगल्या सवयीही चिमुकल्यांना लागणार आहेत़ जिल्ह्यामध्ये आयएसओ मानांकन प्राप्त करण्याचा पहिला मान अहमदपुरातील संत ज्ञानेश्वर विद्यालयाने मिळविला आहे़ त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात अंगणवाड्या आयएसओ होण्याचा मानही अहमदपूरने पटकाविला आहे़ (वार्ताहर)सरपंच, गावकरी यांच्या मदतीतून अंगणवाड्या सुसज्ज झाल्या़ त्यामुळे तालुक्यातील पंधरा अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा मिळाला़ या अंगणवाड्यातून चिमुकल्यांना आणखीन दर्जेदार शिक्षण व संस्कार मिळणार असल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी एस़एऩ मांजरमकर यांनी सांगितले़ ४अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळावे म्हणून प्रकल्प अधिकारी एस़एम़मांजरमकर, वरिष्ठ सहाय्यक सचिन काडवादे, हरिश्चंद्र वाघमारे, रमेश भरडे, अनुपमा पाटील, उषा सोळंके, ए़एऩआकनगिरे, एस़एम़आढाव, एस़एनक़ांबळे, लक्ष्मीबाई पाटील आदींनी परिश्रम घेतले़